साईबाबांची शपथ घेत भाऊसाहेब वाकचौरे यांची दुसऱ्यांदा गद्दारी; शिर्डीचे शिवसैनिक भडकले

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत वाकचौरेंनी ऑनलाईन मोबाईलवर उद्धव ठाकरेंसोबत बोलताना 3 मिनिटांत तब्बल 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली होती.

  • Written By: Published:
Untitled Design 2

Shiv Sainiks from Shirdi are furious : महाराष्ट्राच्या राजकारणात‘ऑपरेशन टायगर’ ची जोरदार चर्चा सुरू असून नवनवीन अपडेट समोर येत आहे. यातच ठाकरे गटाचे अनेक खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील शिंदे सेनेत प्रवेश घेणार अशा चर्चा सुरू आहे. यामुळे आता शिर्डीमध्ये ठाकरेंचे सैनिक संतापले आहे.

ठाकरेंचा दोनदा विश्वासघात केला

उद्धव ठाकरे यांचा भाऊसाहेब वाकचौरे यांनी दोनदा विश्वासघात केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांनी ठाकरेंची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा साईबाबांची शपथ घेतल्यानंतरही वाकचौरे हे शिंदे गटात दाखल होणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेना फुटीनंतर 2022 मध्ये सदाशिव लोखंडे यांनी शिंदे यांची साथ दिली होती. त्यानंतर 2024 मध्ये संधी साधत वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे घरवापसी केली. त्यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी वाकचौरे यांना उमेदवारी देऊ नये, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विरोध डावलत त्यांच्यावर विश्वास दाखवला.

फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता म्हणजे पक्ष फुटला का?; ठाकरेंसमोर आता कोणते तीन मोठे पर्याय?

साईबाबांची खोटी शपथ घेतली

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कोते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर झालेल्या बैठकीत वाकचौरेंनी ऑनलाईन मोबाईलवर उद्धव ठाकरेंसोबत बोलताना 3 मिनिटांत तब्बल 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली होती. ‘मी तुमच्यासोबतच राहीन’ अशी ग्वाही देणाऱ्या या माणसाने दुसऱ्याच दिवशी गद्दारी केली. अशा कपटी आणि गद्दार माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो.

‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देणार, शिर्डीत येण्याचे थेट आव्हान

या पक्षबदलानंतर संतप्त शिवसैनिकांनी काळे कपडे परिधान करून वाकचौरेंचा तीव्र निषेध केला. “जर त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरून दाखवावे,” असे थेट आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे. वाकचौरेंनी मतदारसंघात पाऊल ठेवल्यास त्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने चोख उत्तर दिले जाईल आणि जनता तसेच शिवसैनिक त्यांची जागा दाखवून देतील, असा सज्जड दमही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

follow us