मोठी डील अन् बावनकुळे सुरेश धसांचे बॉस; संजय राऊतांनी दावे अन् गौप्यस्फोटांचा पेटारा उघडला

Sanjay Raut Allegations on Suresh Dhas : संतोष देशमुख याच्या हत्येनंतर आका, आकाचे आका या त्यांच्या दोन शब्दांनी सुरेश धस यांनी राज्य गाजवलं. त्यांनी वाल्मिक कराड गँगला मंत्री धनंजय मुंडे यांचे अभय (Suresh Dhas) असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची आणि मुंडेंची गुपचूप भेट समोर आली. यावर याता संजय राऊतांनी जोरदार टीका केलीये. धसांवर केलेल्या या नवीन आरोपांनंतर धस मैदानात उतरून चोख प्रत्युत्तर देतील का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
मोठा आरोप
डिल झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले गेले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, असा आरोप राऊतांनी केला. मुंडे भेटीवर त्यांनी धसांचा चांगलाच समाचार घेतला. आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो. आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं, असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला.
बदनाम करण्याचं षडयंत्र; त्याचं नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार सुरेश धसांनी दिला इशारा
मला एका प्रमुख माणसाने आली सांगितलं सुरेश धस माघार घेतील. त्यांची ती परंपरा आहे. एखादा मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील. एक फार मोठं डील झाले आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपाने धस यांची एकूणच कार्यपद्धतीच संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे. आता धस त्याला कसं उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉसने ट्रॅपमध्ये अडकवलं?
बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे धस म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? असा चिमटा राऊत काढायला विसरले नाही. इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच क्षणी बैठकीतून बाहेर पडले पाहिजे याला नैतिकता म्हणतात. हे सांगायला पाहिजे होत. परंतु, हिमत आहे का सांगायची? असा रोखठोक सवाल राऊतांनी धस यांना केला.