नगरपंचायत निवडणुकीत पैसे वाटताना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला अटक; जमावाने दिला चोप
येवला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटताना लोकांनी रंगेहात पकडून दिला चोप
Shiv Sena Shinde faction activist arrested : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत दररोजच आचारसंहितेचा भंग केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं दाखवून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. या निवडणुकीत (Elections) सगळेच नियम धाब्यावर बसवत जवळपास सगळ्याच पक्षांकडून आदर्श आचारसंहितेचा भंग केला गेला आहे. या निवडणुकीत जवळपास 25 हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून आदर्श आचारसंहिता राहिली नसल्याचं चित्र दिसून येत आहे. आता येवला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. पैसे वाटत असणारा व्यक्ती हा आमदार दराडे (MLA Darade) यांच्या संस्थेतील असल्याची माहिती आहे. तसेच हा कार्यकर्ता शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांचे पैसे वाटत असल्याची माहिती आहे. त्यानंतर मतदान केंद्राच्या जवळच या कार्यकर्त्याला लोकांनी चांगलाच चोप दिला. आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
लोकप्रतिनिधी आहात जरा कायद्याने वागा; आम्ही कायद्यानेच वागतो, आजी माजी आमदार आमने-सामने
सदरील व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्याच्या विरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख वगनाट्य रंगले’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदार आढळून आले तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून पैसे वाटल्याचे प्रकार उघडकीस आले.
