संगमनेरातील धक्कादायक घटना, सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर अ‍ॅसिड हल्ला…

acid attack on a girl अहिल्यानगरमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अ‍ॅसिड फेकून हल्ला केला आहे.

Acid Attack

Shocking incident in Sangamner, acid attack on a girl studying in sixth standard : अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जाणाऱ्या एका सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अज्ञात माथेफिरूने अ‍ॅसिड फेकून हल्ला केला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तालुक्यात दोन दिवसांत घडलेल्या दुसऱ्या प्राणघातक हल्ल्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामावर परतली रश्मिका मंदाना, ‘मैसा’च्या सेटवरून इंस्टाग्रामवर दिला मोठा अपडेट

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा परिषद शाळेत संबंधित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे. दरोरोजच्या प्रमाणे शाळा सुटली व ती आपल्या घरी निघाली होती. मात्र त्याच वेळी वाटेत दबा धरून बसलेल्या एका अज्ञात युवकाने अचानक तिच्यासमोर येऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. अ‍ॅसिड अंगावर पडताच ती मुलगी वेदनेने ओरडू लागली. मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

मुलीची तब्येत ठीक मात्र मानसिक धक्का

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी जमा होत जखमी मुलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुलगी घाबरली आहे. या हल्ल्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस पथक आरोपीचे शोध घेत आहे.

follow us