ट्रोलिंग थांबवा.. माझी नाहक बदनामी; नवले कार अपघात प्रकरणात गौतमी पाटील ढसाढसा रडली

Gautami Patil : पुण्यातील नवले पुलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे.

Gautami Patil

Gautami Patil : पुण्यातील नवले पुलजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत  भावुक आवाहन केले आहे. या प्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे. माझी ट्रोलिंग थांबवावी असं आवाहन गौतमी पाटीलकडून करण्यात आला आहे.

30 सप्टेंबर रोजी नवले पुलाजवळ एका कारने रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. सध्या रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्या कारने धडक दिली होती ती कार गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या मालकीची असल्याने गौतमी पाटीलवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र आता गौतमी पाटील यांच्याकडून देखील प्रतिक्रिया आली असून ट्रोलिंग थांबवण्यात यावी असं आवाहन गौतमी पाटलीकडून करण्यात आले आहे.

अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. तेव्हा माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. जेव्हा मला अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला. माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की, जे काही चाललं ते आपण कायदेशीर करु म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे.

तसेच मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे. माझ्याकडून मदत पाठवली होती पण त्यांनी नाकारली. पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला होता त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं मात्र त्यांनी मदत नाकारली आणि कायदेशीर सगळं करु असं सांगितलं त्यामुळे मी गप्प बसले असं देखील गौतमी पाटीलने सांगितलं.

ट्रोलिंग थांबवा..नाहक बदनामी करु नका

जिथे माझा काहीच संबंध नाही तिथे माझं नाव बदनाम केलं जातं आहे. मी पोलिसांना पुर्ण सहकार्य दिलं. पोलिसांनी कारची कागदपत्रं, चालकाचे तपशील आणि अपघात कसा झाला तेव्ही मी कुठे होते याबाबत मी सगळी माहिती दिली आहे आणि आता कायदेशीर मार्गाने जे करायला पाहिजे होते ते मी करत आहे.

नवी मुंबई विमानतळ उद्घाटन, PM मोदी अन् दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख 

मी कुटुंबियांचं सात्वन करायला गेले नाही हे बरोबर आहे कारण माझ्या तारखा आधी घेतलेल्या असतात. समोरुन खूप अ‍ॅडव्हान्स येतो, खर्च खूप झालेला असतो त्यामुळे मी माझी कामं रद्द करु शकत नाही. माझे भाऊ लोक तिथे होते तिथे त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले. या प्रकरणात काय काय घडलं आहे ते माध्यमांना माहित आहे असंही गौतमीने सांगितलं.

follow us