पवारांना काही झालं तर, सरकार जबाबदार राहणार नाही; भाजप नेत्याने ठणकावून सांगितलं

  • Written By: Published:
पवारांना काही झालं तर, सरकार जबाबदार राहणार नाही; भाजप नेत्याने ठणकावून सांगितलं

मुंबई : शरद पवारांच्या जीवाला काही झालं तर, त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. शरद पवारांनी केंद्राची झेड प्लस सुरक्षा नाकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. झेड प्लस सुरक्षेतून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार असे शरद पवार (Sharad Pawar) यांना वाटत असेल तर, हा त्यांच्या नेरेटिव्हचा भाग असू शकतो असेही मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले आहेत. (Sudhir Mungantiwar On Sharad Pawar)

महायुतीत शाब्दिक युद्ध! भुजबळ म्हणाले, महायुतीचं नुकसान टाळायचं असेल तर..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र राज्य सरकारची सुरक्षा मिळत असताना केंद्राने सुरक्षा देण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं. त्यानंतर आज शरद पवार यांनी थेट सुरक्षा व्यवस्थाच नाकारली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांचे वाहन घेण्यासही शरद पवारांनी नकार दिला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचे अधिकारी काल (दि.30) सकाळी शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. सीआरपीएफच्या पंधरा अधिकाऱ्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. परंतु,यावेली पवारांनी ही सुरक्षा घेण्यास स्षष्ट सांगून टाकले.

अजितदादांसोबतची युती म्हणजे ‘असंगाशी संग’; शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनंही सुनावलं

झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांना संशय 

केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत. आपल्याला झेड प्लस सुरक्षा का दिली जात आहे याचं उत्तर मिळालेलं नाही. यामागे काय कारण आहे याचीही माहिती नाही. गृह मंत्रालयाच्या या निर्णया पाठीमागे काय कारण आहे याची माहिती माझ्याकडे नाही. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, माझ्या व्यतिरिक्त आणखी दोन जणांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे.

अजितदादांचं ठरलंच! महायुतीला गाफील ठेवत जागांचा आकडाच सांगितला; ‘इतक्या’ जागा लढणार

सुरक्षेच्या कारणास्तव पवारांना  गाडी बदलण्याचा सल्ला

पवारांना सुरक्षा देण्याच्या प्रस्तावावेळी पवारांनी  सुरक्षेच्या कारणास्तव गाडी बदलण्यास सांगण्यात आले आहे. मात्र पवारांनी त्यांनी नकार दिला. याशिवाय दिल्लीतील पवारांच्या घराचे जे वॉल कंपाउंड आहे त्याची उंची वाढविण्यासही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तसेच पवारांच्या वाहनात सुरक्षा यंत्रणेचा एक माणूस उपस्थित असेल असे सांगण्यात आले होते. मात्र या सर्व अटी शरद पवारांनी नाकरल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube