साखरेच्या दरवाढीने ग्राहकांना झटका! D-Mart सह क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता 5 किलोच साखर मिळणार

Sugar price hike च्या पार्श्वभूमीवर क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी ग्राहकांच्या साखर खरेदीवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे.

Sugar

Sugar price hike shocks consumers Now, only 5 kg of sugar will available on quick-commerce platforms including D-Mart : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत साखरेच्या किमती वाढल्या आहेत. साखरेचा मर्यादित पुरवठा आणि सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी यामुळे बाजारात साखरेची उपलब्धता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर D-Mart सह BigBasket, Blinkit आणि Swiggy Instamartसारख्या रिटेल व क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी ग्राहकांच्या साखर खरेदीवर मर्यादा आणण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून IFFI चित्रपट बाजारात मराठी सिनेमाला संधी

गेल्या दोन महिन्यांत किरकोळ बाजारातील साखरेच्या दरात सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही विक्रेत्यांनी एका ग्राहकाला केवळ 3 ते 5 किलोपर्यंतच साखर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात साखर घेण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणाम पॅकेज्ड फूड उत्पादक कंपन्यांवरही होत आहे. साखरेसोबतच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साखरेच्या खरेदीवर रेशनिंग

बाजारातील दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात 10 लाख टन साखर आयात करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, तोपर्यंत उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यासाठी अनेक रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांच्या खरेदीवर मर्यादा आणली आहे. काही ठिकाणी ग्राहकांना 1 किलोच्या दोन-तीन पॅकपर्यंत, तर काही ठिकाणी 5 किलोच्या एका पॅकपर्यंतच साखर खरेदी करता येत आहे. AWL Agribusinessचे कार्यकारी उपाध्यक्ष अंगसू मल्लिक यांच्या मते, काही रिटेल चेननी एका ग्राहकाला खरेदी करता येणाऱ्या साखरेच्या पॅकेट्सची संख्या कमी केली आहे. उपलब्ध साठा अधिकाधिक ग्राहकांना मिळावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Blinkit, BigBasketवरही मर्यादा

दिल्ली-NCRमध्ये Blinkitवर काही ब्रँडच्या साखरेच्या खरेदीवर प्रति व्यवहार 5 किलोची मर्यादा ठेवण्यात आली आहे. काही उत्पादनांबाबत मर्यादित साठा उपलब्ध असल्याची सूचनाही ग्राहकांना दिली जात आहे.पुण्यात Blinkitवर ग्राहकांना 1 किलोचे जास्तीत जास्त तीन पॅक खरेदी करता येत आहेत. BigBasketनेही काही निवडक ब्रँडसाठी 1 किलोच्या पाच पॅकपर्यंत खरेदीची मर्यादा ठेवली आहे.

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; कंत्राटदारांच्या प्रश्नावरूनही सरकारला घेरलं

Swiggy Instamart वरही काही ब्रँडच्या साखरेसाठी दोन किलोपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील D-Martच्या एका स्टोअरमध्ये ग्राहकांना बिलावर जास्तीत जास्त 5 किलो साखर खरेदी करता येईल, अशी सूचना लावण्यात आली होती.सणासुदीच्या काळात साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवसांत बाजारातील पुरवठा आणि दरांवर ग्राहकांचे लक्ष राहणार आहे.

follow us