सुनेत्रा पवारांचं राज्यसभा खासदार होताच मंत्रिपदावर भाष्य; म्हणाल्या, संधीचं सोनं करेल

सुनेत्रा पवारांचं राज्यसभा खासदार होताच मंत्रिपदावर भाष्य; म्हणाल्या, संधीचं सोनं करेल

Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेला पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांना आता पक्षाकडून बिनविरोध राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. (Sunetra Pawar ) त्यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर सध्या त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं अनुषंगाने त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की मला मंत्रिपद मिळाव ही अपेक्षा करणाऱ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु, जर मंत्रिपदाची संधी मिळालीच तर त्या संधीच मी नक्की सोन करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भावी केंद्रीय मंत्री  काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वेगळा सूर

मंत्रिपदाबाबत सुनेत्रा पवार यांनी संधीच सोन करेल अशी प्रतिक्रिया दिली असल्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारामध्ये सुनेत्रा पवार मंत्री होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. दरम्यान, बारामतीमध्ये काही कार्यकर्त्यांनी राज्यसभेवर निवड झाली असल्याने अभिनंदनाचे जे बॅनर लावले आहेत त्यावर भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेखही केला असल्याने या चर्चेंना उधान आलं आहे.

त्यामध्ये गैर काही नाही

यावेळी पत्रकारांनी बारामतीत नवी दादा आमदार पाहिजे अशी चर्चा असल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या त्यामध्ये काही वावग नाही. कुणालाही इच्छा असते. आणि तशी इच्छा ठेवली पाहिजे. त्यामुळे कुणाला आमदार होण्याची इच्छा असेर तर त्यामध्ये काही गैर नाही असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथे अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे.

लाखाच्या परकाने पराभव  एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यावर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी येथून उभं केलं होतं. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद व या मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे या उभ्या होत्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर सुप्रिया सुळे यांनी त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना राज्यसभेची संधी देत त्यांना बिनविरोधी निवडून आणण्यात आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज