Maratha Reservation : जरांगेंच्या सभेआधी सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट; राज्य सरकराच्या प्रयत्नांना यश

Maratha Reservation : जरांगेंच्या सभेआधी सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट; राज्य सरकराच्या प्रयत्नांना यश

नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये आज (14 ऑक्टोबर) मनोज जरांगे यांची भव्य जाहीर सभा पार पडत आहे. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून महत्वाची अपडेट समोर येत आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून ती यशावकाश सुयोग्य पीठाकडे पाठविण्यात येईल, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने स्पष्ट केले. राज्य सरकारच्या प्रयत्नांचे हे एक प्रकारे यश असल्याचे मानले जात आहे. (Supreme Court accepted the curative petition filed by the state government against the decision to cancel the Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्याबाबतची पुनर्विचार याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. यानंतर आता अंतिम उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची तरतुद आहे. मूळ निर्णयात आणि त्यानंतर पुनर्विचार याचिकेदरम्यान याचिकाकर्त्यावर मोठा अन्याय होत आहे, नैसर्गिक न्यायाचे पालन केले जात नाही तर अर्जदारास क्युरेटिव्ह याचिका दाखल करता येते. याच तरतुदीनुसार ही याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने ती स्वीकारली आहे.

Manoj Jarange Patil : सरकारच्या हातात दहा दिवस, आरक्षण घेणारच! सभेआधीच जरांगे पाटलांचा इशारा

मात्र याचिका दाखल करण्यापूर्वी दिलेल्या निकषांनुसारच क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे, असे संबंधित ज्येष्ठ वकिलांनी न्यायालयाला प्रमाणित करुन देणे आवाश्यक असते. न्यायालयाला जर याचिका निकषाबाहेर किंवा समाधानकारक न वाटल्यास ती फेटाळण्याचा आणि याचिकाकर्त्यास दंड आकारण्याचा आदेश देता येतो. त्यामुळेच ही याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्याने मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. मात्र कायदेशीर जाणकारांच्या मते, रेअरेस्ट रेअर क्युरेटिव्ह याचिकांमध्ये पुनर्विचार याचिकांमधील निकाल बदलला जातो. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत नेमके काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोर्टाने झापल्यानंतर नार्वेकरांचे सूचक बोल; म्हणाले, लवकरात लवकर निर्णय…

मनोज जरांगेंची सभा :

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्यापूर्वी सरकारला मराठा आरक्षणाबाबत पाऊल उचलण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत आज संपत आहे. त्यानंतर आता जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तब्बल शंभर एकरावर ही सभा होत आहे.  सभेला दुपारी बारा वाजता सुरुवात होणार आहे.  मात्र, काल रात्रीपासूनच मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीत जमा होत आहेत.  सभेचं मैदान गर्दीनं गजबजून गेलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube