रिल स्टार की गुन्हेगार? सुरेंद्र पाटील अटकेत; घरातून हत्यारांचा मोठा साठा जप्त

सुवेंद्र पाटीलच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हत्यारे आणि रोकड जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (1)

Surendra Patil arrested : ठाणे गुन्हे शाखेने सोशल मीडियावर दहशत माजवणारा कुप्रसिद्ध ‘रिल स्टार’ सुरेंद्र पाटील याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या धाडीत त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर हत्यारे आणि रोकड जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटीलच्या ठिकाणी छापा टाकताच धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याच्याकडून तब्बल 3 देशी बनावटीच्या पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 2 एअर गन, 405 जिवंत काडतुसे आणि 167 जिवंत छर्रे जप्त करण्यात आले. याशिवाय 2 तलवारी, 3 लोखंडी कोयते, 1 सुरा, 2 चाकू, लोखंडी रॉड आणि 3 लाख 20 हजार रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही हत्यारे अत्यंत चलाखीने लपवण्यात आली होती. घरातील चप्पल स्टँडच्या मागे गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये काही शस्त्रे लपवण्यात आली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. सुरेंद्र पाटील हा सोशल मीडियावर ‘रिल स्टार’ म्हणून ओळखला जात असला, तरी त्याचा गुन्हेगारी भूतकाळ गंभीर आहे. त्याच्यावर 12 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये मारामारी, धमकी, तसेच एका मुलीच्या विनयभंगाचा गुन्हाही समाविष्ट आहे.

IND vs ZIM : IPL नंतर ‘या’ संघाशी भिडणार भारतीय संघ, जुलैमध्ये करणार दौरा; वेळापत्रक जाहीर

धक्कादायक बाब म्हणजे, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून त्याने रील तयार केल्याचा प्रकारही समोर आला आहे. यामुळे पोलिस यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, ठाणे गुन्हे शाखा आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पाटीलकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्यारे कशी आली, त्याचा इतर गुन्हेगारी टोळ्यांशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

या कारवाईमुळे सोशल मीडियाच्या आडून गुन्हेगारी करणाऱ्यांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

follow us