मोठी बातमी! अंबरनाथमधील एमआयडीसीत वायूगळती; सर्वत्र पसरला धूर

मोठी बातमी! अंबरनाथमधील एमआयडीसीत वायूगळती; सर्वत्र पसरला धूर

Maharashtra News : ठाण्याजवळच्या अंबरनाथ शहरातून धक्कादायक बातमी (Ambarnath News) समोर आली आहे. शहरातील मोरिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक वायूगळती (Chemical Gas Leakage) झाली आहे. या प्रकाराने शहरात सर्वत्र धुराचे साम्राज्य दिसून येत आहे. नागरिकांतही घबराट पसरली आहे. एमआयडीसीतील (MIDC) एका कंपनीतून गुरुवारी रात्री रासायनिक वायूगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता हा गॅस चुकून लीक झाला की कंपनीतूनच सोडण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  या घटनेने शहरात मात्र घबराट पसरली आहे. नागरिक धास्तावले आहेत. शहरात दूरवर धुराची चादर दिसून आली. या धुरामुळे अनेकांना त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धूर कसा पसरला याची माहिती स्थानिक प्रशासनाने अद्याप दिलेली नाही.

नाना पटोले यांनी भाजपाचा मोहरा फोडला; विदर्भात भाजपला गळती

गुरुवारी रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोड परिसरात मोठी वायूगळती झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता वायूगळती कोणत्याही कंपनीतून झाली नसल्याचे समोर आले. परंतु या गळतीमुळे नागरिकांना त्रास झाला.

अनेक लोकांच्या घशात खवखव आणि डोळ्यांत जळजळ होत असल्याचे दिसून आले. रात्री नऊ ते 12 वाजण्याच्या सुमारास शहरात केमिकल पसरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. आता येथील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

मुंबईत भीषण अपघात! भरधाव वेगातील आलिशान कारने दोघा कार्यकर्त्यांना चिरडले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube