SIR’साठी बीएलओ घरी येण्यापूर्वी काय करायचं?; निवडणूक आयोगाने सांगितल्या चार महत्वाच्या गोष्टी

एसआयआरला संदर्भात लोकांमध्ये गोंधळ आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत तुमच्या घरी बीएलओ येतील.

News Photo   2026 05 22T173756.502

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदत (Election Commission) घेत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन मोहिमेची माहिती दिली आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणं सोपं आहे. तुम्ही कुठंही असले तरी चालेल. तुमचं मतदार यादीत नाव तु्म्हाला पाहाता येईल. निवडणूक आयोगाने वेबसाईटमध्ये संपूर्ण देशाच्या राज्यांची यादी दिली आहे. राज्य, जिल्हा निवडून बघा. तुम्ही कोणत्या भागात मतदान केलं हे तुम्हाला जर माहीत नसेल, पण तुमच्या मतदारसंघाचे नाव आठवत असेल तर तुमचं नाव टाकून शोधलं तर तुमचं नाव तुम्हाला मिळेल असं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अंतर्गत मतदार गणना फॉर्म भरणं आणि सबमिट करणं आता पूर्णपणे ऑनलाईन केलेलं आहे. घरी बीएलओ येणार त्यावेळी नेमके काय करावं याची माहिती आज राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तुम्ही कोणत्या राज्यातील आणि कोणत्या मतदारसंघात मतदान केलं होतं हे सांगितलं तर तुमचं नाव शोधता येईल. त्यामुळे ती नावं अधिकाऱ्यांना द्या. संगणकातून तुम्ही शोधत आणि काढत असाल तर आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा आणि तर तुमचं राज्य, मतदारसंघ, जिल्हा आणि बुथ तसंच सीरिअल नंबर शोधून काढलं तर आम्हाला ते बरं पडेल असं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाला धक्का, SIR प्रक्रियेसाठी आधार कार्ड वैध

एसआयआरला संदर्भात लोकांमध्ये गोंधळ आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत तुमच्या घरी बीएलओ येतील. तुमच्याकडं माहिती मिळाली नाही तर निवडणूक आयोगाने ११ सर्टिफिकेट सांगितलेली आहेत. त्यातील एक सर्टिफिकेट दाखवावे. तुम्ही नागरिक असल्याचे आणि जन्म ८७ पूर्वी जन्म झाल्याचा पुरावा द्या. काय सर्टिफिकेट एड करायचं ते सांगा. ११ सर्टिफिकेट आखून दिलेली आहेत. त्या व्यतिरिक्त सर्टिफिकेट असेल तर कळवा. मॅपिंग असेल तर कागदपत्रे देण्याची गरज नाही. मॅपिंग नसेल तर कागदपत्रे द्यावी लागतील. ११ पैकी एक डॉक्यूमेंट दाखवायचं आहे असेही राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

एखाद्याचं नाव २०११ मध्ये असेल पण त्याचं आडनाव जुळत नसेल. ते डिस्क्रिपन्सीत येतं. तसं असेल तर संबंधित कागदपत्रे दिले पाहिजे. उदा. लग्नानंतर नाव बदललं असेल तर लग्न पत्रिका दाखवावी. हा पुरेसा पुरावा आहे असंही ते म्हणाले. तसंच, एक महिना कोणी आपल्या गावात नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणीही सही करू शकते. समजा महिनाभर नसाल तर ड्राफ्ट प्रसिद्ध केल्यावर फॉर्म नंबर ६ भरून द्यायचा आहे. डिक्लेरेशन द्यायचे आहे. १ महिन्यात तुम्ही नोंदणी करा. पण ड्राफ्ट यादीत तुमचं नाव नसेल तर तुमचा हक्क जात नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्व राजकीय पक्षांना सांगितलेले आहे. आमच्या बीएलओसोबत मदत करण्यासाठी पारदर्शकता ठेवण्यासाठी माणसं द्यायला सांगितले आहे. १ लाख १३ हजार बीएलओ सर्व पार्टी मिळून आहेत. काही पक्षांनी ६० हजार नेमले आणि काहींनी ३० हजार नेमले आहेत असेही त्यांनी सांगितले.

नाव नोंदणीसाठी आल्यावर काय कराल

निवडणूक आयोगाच्या साईटवरून खालील गोष्टी काढून ठेवा

राज्य,

जिल्हा,

मतदारसंघ,

बुथ

सीरिअल नंबर

महाराष्ट्रात मतदार याद्यांची मॅपिंग सुरु

असं आहे संपूर्ण सखोल विशेष फेरतापसणी (SIR) चं वेळापत्रक?

20 ते 29 जून 2026 : गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

30 जून ते 29 जुलै 2026 : मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील.

5 ऑगस्ट 2026 : प्रारूप मतदार याद्यांची अधिकृत प्रसिद्धी केली जाईल.

5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 : मतदारांना प्रारूप यादीवर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील.

3 ऑक्टोबर 2026 पर्यंत : प्राप्त झालेले सर्व दावे आणि हरकती निकालात काढल्या जातील.

7 ऑक्टोबर 2026 : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

follow us