पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल 

  • Written By: Published:
पराभव स्वीकारण्याची मानसिकता नाही, म्हणून राहुल गांधींची रडारड सुरू, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल 

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं (Election Commission) यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर केली आहे.

त्यांनी ट्विटवर पोस्ट करत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे.

उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे. खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले‘ असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

39 लाख मतदार अचानक कसे वाढले : राहुल गांधी

आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना 2019 ते 2024 या काळात 34 लाख मतदारांची जोडणी झाली. नंतर 2024 मधील लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत 39 लाख मतदार वाढले. महाराष्ट्रात मतदारांची संख्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. आम्ही फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांची मागणी करत आहोत. 2019 मधील विधानसभा निवडणूक आणि 2024 मधील निवडणुकीत 34 लाख मतदार होते. तसेच 2019 आणि 2024 मधील लोकसभा निवडणुकीत 39 लाख मतदार होते. म्हणजेच मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार कुठून आले, असा सवाल राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारला. यानंतर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली.

‘छावा’ सारख्या चित्रपटाचा भाग होणे, स्वतःला मी नशीबवान समजतो ; ओंकार महाजन

महाराष्ट्रातील मतदार याद्यांतील घोळ गंभीर अनियमिततांचे संकेत देत आहे. मतदारसंघांतील भाजपाच्या विजयातील अंतर आणि मतदार यादीत जोडण्यात आलेल्या मतदार संख्येच्या बरोबरीने आहे असे राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय निर्माण झाला आहे. असं देखील लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube