अजित पवारांची नाराजगी दूर होणार का?, 24 तासांपासून झालेत नॉट रिचेबल

  • Written By: Published:
अजित पवारांची नाराजगी दूर होणार का?, 24 तासांपासून झालेत नॉट रिचेबल

Ajit Pawar is angry : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर असल्याच्या पार्श्वभूमीवर (Ajit Pawar ) उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले दोन दिवस नॉट रिचेबल आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. ही नाराजी खातेवाटपावरून असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.

प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर तो माझ्या.. अजित पवारांवर भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्तारानंतर एक-दोन दिवसांत खातेवाटप होईल, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तथापि, दोन दिवस उलटल्यानंतरही खातेवाटप झालेले नाही. तशातच अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनाकडं पाठ फिरवली आहे. दोन दिवसांच्या कामकाजात त्यांनी भाग घेतलेला नाही. त्यांची ही नाराजी खातेवाटपावरून असल्याची वदंता राष्ट्रवादीत आहे.

सोमवारी अजित पवार अधिवेशनाकडे फिरकलेच नाहीत. ते दिल्लीला गेल्याची चर्चा होती. मंगळवारीही ते अधिवेशनात दिसले नाहीत. ते कोणाचे फोनही घेत नव्हते. त्यामुळे अजित पवार गेले कुठे आणि त्यांनी अधिवेशनाकडे पाठ का फिरवली, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. पूर्वी राष्ट्रवादीकडे असलेले महिला व बालविकास खाते आणि वैद्यकीय शिक्षण खातेही राष्ट्रवादीला मिळेल की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपुरात मंगळवारी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होते. त्याला प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाकडेही अजित पवार यांनी पाठ फिरवली. त्यानंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार ते नागपुरात आपल्या शासकीय बंगल्यातच असून, त्यांनी कोणाचीही भेट घेण्याचे टाळले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube