मुख्यमंत्री आज आमदार सुरेश धसांच्या मतदारसंघात; धनंजय मुंडेंची कार्यक्रमाकडं पाठ, कारण काय?

  • Written By: Published:
मुख्यमंत्री आज आमदार सुरेश धसांच्या मतदारसंघात; धनंजय मुंडेंची कार्यक्रमाकडं पाठ, कारण काय?

Devendra Fadnavis in Beed : बीडच्या आष्टीत काही विकासकामांच्या उद्घाटनासाठी (Fadnavis ) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित सरकारी कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे मात्र उपस्थिती राहणार नाहीत. मुंडे यांना सरकारी कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. मात्र, ते या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.

खरे बदनामिया धनंजय मुंडेचं; दादागिरी ते हडपलेली जमीन, दमानियांचं सडतोड प्रत्युत्तर

गैरहजेरीचे कारण काय?

आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्याउद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत.. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का असा प्रश्न होता मात्र.. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन आज असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाहीत. मात्र, पंकजा मुंडे या सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळू शकतात.

अंजली दमानिया, धनंजय मुंडे आरोप-प्रत्यारोप

महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आता राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीची खरेदी करताना अंजली दमानिया यांना विचारुन दर ठरवायचा का? त्या बोलतील तोच दर उचित, अन्यथा उचित नाही. त्यांना विचारुन दर दिला तर ते योग्य, नाहीतर भ्रष्टाचार म्हणायचा का, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आडनावाचा उल्लेख ‘बदनामिया’ असा करत त्यांची खिल्ली उडवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube