कर्जतच्या जंगलातील वृक्षतोड थांबली? टोरंट पॉवर प्रकल्पाला विरोध वाढला

Torrent Power Project : कर्जत तालुक्यात सुरु असणाऱ्या टोरंट पॉवर प्रकल्पामुळे विरोध सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत आहे

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Torrent Power Project

Torrent Power Project : कर्जत तालुक्यात सुरु असणाऱ्या टोरंट पॉवर प्रकल्पामुळे विरोध सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत आहे. या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा तसेच पर्यावरणप्रेमी देखील जोरदार विरोध करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. विरोधानंतर जंगलातील वृक्षतोड थांबविण्यात आली आहे. याबाबत ‘सकाळ’ ने माहिती दिली आहे.

‘सकाळ’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पाला विरोध वाढत असल्याने तसेच 28 ऑक्टोबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कर्जतमध्ये होणारी सभा पाहता वृक्षतोड तात्पुरती थांबवण्यात आली आहे. वृक्षतोड तात्पुरती थांबली असली तरी आंदोलनाचे स्वरूप राज्यव्यापी होताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

गुजरातच्या टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा साई डोंगर -1 जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प कर्जत तालुक्यात सुरु होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असल्याने या वृक्षतोडीविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या प्रकल्पाविरोधात ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे तर आता या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटासह (Shivsena UBT) , काँग्रेस (Congress) आणि मनसे (MNS) सारख्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पाला विरोध केला आहे.

तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि आमदास आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) , खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वृक्षतोड झालेल्या परिसराला भेट देत पाहणी देखील केली आहे. तर 28 ऑक्टोबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे कर्जतमध्ये सभा घेणार आहे.

कंपनीकडून 90 हजार झाडे लावण्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस 

तर दुसरीकडे या वादावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साई डोंगर-1 प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. प्रकल्पास्थळी तसेच अन्य वनक्षेत्रात कंपनीकडून 90 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे.

शिक्षक, पदवीधरची रणधुमाळी! 5 जागांवर कोण मारणार बाजी…-

follow us