वाल्मिक कराड मुख्यमोहरा, त्याला मारून टाकतील; तृप्ती देसाईंना वेगळीच शंका
Trupti Desai On Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती खालावली आहे. कराडच्या पोटात दुखू लागल्याने त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात (Government hospital) दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी भाष्य केलं. तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी वाल्मीक कराड याला मारून टाकतील, अशी भीती व्यक्त केली.
थायलंडमध्ये समलिंगी विवाह कायदा लागू, जोडप्यांनी आज थाटामाटात केलं लग्न
वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तृप्ती देसाई यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, वाल्मिक कराड हा न्यायालयीन कोठडीमध्ये असून काल रात्री त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. वाल्मिक कराड याच्यावर चांगले उपचार झाले पाहिजेत. कारण, तो खंडणी प्रकरणातील आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्यमोहरा आहे. मात्र, वैद्यकीय कारण सांगून वाल्मिक कराडला याला मारून तर टाकणार नाहीत ना, अशी भीती मला वाटतेय, असं देसाई म्हणाल्या.
पुढं त्या म्हणाल्या, वाल्मिक कराडचे राजकीय, अध्यात्मिक आणि गुंडगिरीचे कनेक्शन हे सगळं संपवायचं असेल तर कदाचित त्याला संपवलं जाऊ शकतं, ही भीती मला वाटते. ज्या काही शासकीय यंत्रणा या प्रकरणांमध्ये काम करत आहे, त्यांना मला एवढचं सांगायचं आहे की, वाल्मिक कराड याच्यावर चांगले उपचार करावेत. कारण या प्रकरणाचा शेवट होईपर्यंत वाल्मिक कराड हा जिवंत असला पाहिजे, असं देसाई म्हणाल्या.
कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन अदानीच्या घशात जाऊ देणार नाही; वर्षा गायकवाड कडाडल्या
तृप्ती देसाईंचा मुंडेंनाही इशारा
तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हापासून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जातयं. त्यामुळे व्यथित झालेल्या तृप्ती देसाई परळीत येऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी. मी अजून फार काही बोलले नाही. पण सातत्याने खालच्या पातळीवर ट्रोलिंग कऱण्यात आली तर मी परळीत येऊन बसेन आणि लोकशाही मार्गाने त्यांना धडा शिकवेन, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
कराड 6 महिने तुरुंगातून बाहेर येणार नाही…
दरम्यान, खंडणी आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. कारण वाल्मिक कराडवर मकोका गुन्ह्याची नोंद झाली आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे कराड पुढील १८० दिवस म्हणजेच ६ महिने तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.