Uddhav Thackeray at Barasu : रिफायनरी लादल्यास महाराष्ट्र पेटवू; राजापूरमधून ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray at Barasu : कातळशिल्प रिफायनरीत जाऊ देणार नाही. सोलगावच्या कातळशिल्पाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी. संवर्धनासाठी मी युनोस्कोला पत्रं लिहलं होतं. हे वास्तव आहे व इथे माती परिक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीला जे विरोध करत आहेत, त्या आंदोलकांशी संवाद साधला असून तेथील कातळशिल्पाची पाहणी देखील केली आहे.
या वेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे. बारसू रिफायनरी संदर्भात ग्रामस्थांची बाजू त्यांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थिीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख आहे. त्यांना तीन जिल्ह्यात देखील कोणी ओळखत नव्हतं, असा टोला त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीवरुन थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, असा घणाघात ठाकरेंनी केला आहे.
Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी
तसेच बारसू येथील हा प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या, असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.