6 खासदारांनंतर 65 नगरसेवकही देणार उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Naresh Mhaske On Operation Tiger : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षातील तब्बल 6 खासदारांनी

Naresh Mhaske On Operation Tiger

Naresh Mhaske On Operation Tiger : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षातील तब्बल 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाची साथ सोडणाऱ्या सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे लोकसभेनंतर आता उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत निवडून आलेले ठाकरेंचे 65 नगरसेवकही ठाकरे यांची साथ सोडणार आहे असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

6 खासदार आमच्याकडे येणार की नाही हे मला माहिती नाही पण मुंबईतील तुमचे 65 नगरसेवकांपैकी किती तुमच्याकडे राहतात हे बघ, कोणीही तुमच्यासोबत राहणार नाहीत. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्ष बुडवणारे संजय राऊत हेच तुमच्यासोबत राहतील. याच्याशिवाय तुमच्यासोबत कुणीच राहणार नाही असं खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले.

ठाकरेंना पुन्हा धक्का, 6 खासदार सोडणार पक्षाची साथ

राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. आज या ऑपरेशनअंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात होत आहे. सहा खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडत नवीन गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभा अध्यक्षांनी देखील मंजुरी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

शेवगावात समृद्ध पंचायत राज वाद तापला; अधिकाऱ्यांसाठी तालुक्यातील सरपंच एकवटले…

ठाकरेंची साथ सोडणारे खासदार

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असा दावा करण्यात येत आहे.

follow us