एका जागेवरून बंडखोरी होत असेल तर आम्ही तीन सोडल्या त्याचं काय? उद्धव ठाकरे गरजले

एका जागेवरून बंडखोरी होत असेल तर आम्ही तीन सोडल्या त्याचं काय? उद्धव ठाकरे गरजले

Lok Sabha Election : लोकसभा मतदानाचे दोन टप्पे झाले असले तरी सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेली चर्चा काही थांबलेली नाही. शिवसेनेने चर्चा न करता निर्णय घेतल्याने काँग्रेस अनेक दिवस नाराज होती. तसंच, शिवसेनेने माघार घ्यावी यासाठी काँग्रेसकडून राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर मोठे प्रयत्न झाले. परंतु, त्या जागेवरील निर्णय झाला नाही. अखेर नाराज असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेताल. तर शिवसेनेकडून चंद्रहार पाटील मैदानात आहेत. आज त्यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी आपण किती जागा सोडल्या आणि का सोडल्या याचा पाढाच वाचला.

 

महाविका आघाडीला फायदा झाला पाहिजे

रामटेक कोल्हापूर अमरावती या जागा आम्ही सोडल्या. विचार केला तर या जागा आम्ही का सोडाव्यात? असा प्रश्न उपस्थित करत आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. तसंच, महाविकास आघाडीचा फायदा फक्त मला नको सर्वांनाच झाला पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर भाष्य केलं. ते सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

 

प्रत्येक जागा जिंकणार

पाच-पाच वेळा जिंकलेल्या जागा आम्ही सोडल्या आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तिथे आम्हालाही वाटत होत इथ लढल पाहिजे. परंतु, आम्ही त्या जागा सोडल्या. अमरवतीमध्ये, रामटेकमध्ये, कोल्हापुरमध्ये आमचे शिवसैनिक सांगत आहेत की आपण इथली जागा नक्की जिंकणार. या प्रत्येक जागेवरील काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकेल असं शिवसैनिक सांगत आहेत याला म्हणतात आघाडीधर्म असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

 

तर जागा कुणाला गेली असती?

मागच्या काही काळात आम्ही चूक केली. ज्यांच्यासोबत होतो ते आज देश लुटत आहेत असा गंभीर आरोप ठाकरे यांनी भाजपवर केला. तसंच, ज्यावेळी भाजपने आमचा विश्वासघात केला तेव्हा मी युतीवर लाथ मारली आणि महाविकास आघाडी केली. परंतु, जर आम्ही युतीमधून बाहेर आलोच नसतो तर सांगलीची जागा कुणाकडे असती? असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. परंतु, मी लुटारू नाही त्यामुळे मी देश लुटणाऱ्यांच्या बाजून राहणार नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज