ठाकरेंनी अखेरच्या क्षणी पत्ते केले ओपन, वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान; काय घडलं?

Waqf Amendment Bill : सत्ताधाऱ्यांकडून संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात (Waqf Amendment Bill) आल्यानंतर संसदेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या विधेयकावर मतदान पार पडलं त्यामध्ये विधेयकाच्या बाजूने 288 मतं पडली तर 232 मतं विधेयकाच्या विरोधात पडले. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत गुरुवारी मध्यरात्री बहुमताने पास झाले. विधेयकावरील मतदानाच्या वेळी एक राजकीय घडामोड घडली ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने अखेरच्या क्षणी पत्ते ओपन इंडिया आघाडीला साथ देत विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
बुधवारी तब्बल 11 ते 12 तास या विधेयकावर चर्चा झाली. त्यामध्ये विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला या मुद्द्यावर धारेवर धरले तर सत्ताधारी पक्षाने देखील या विधेयकाच्या बाजूने जोरदार बॅटींग केली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) विरोधकांना ठणकावून सांगितलं की, विरोधकांकडून भ्रम केला जात असल्याचं सांगत सडेतोड उत्तर दिलं. तुम्ही काय धमकावण्याचा प्रयत्न करीत आहात, हा भारत सरकारच्या संसदेचा कायदा आहे सर्वांनाच त्याचा स्वीकार करावा लागणार. असं म्हणत विरोधकांची तोंड बंद केली.
भाजपचे स्वप्न पूर्ण : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर
विधेयकावरील चर्चेत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाग घेतला. त्यांनी सरकारच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. मी संयुक्त संसदीय समितीत होतो पण दुर्दैवान या समितीमध्ये विधेयकातील तरतुदींवर त्यातील कलमांवर सविस्तर चर्चाच झाली नाही असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. वक्फ सुधारणा विधेयकाच्या शेवटच्या क्षणी भूमिका जाहीर करू असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानुसार ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जळजळीत टीका
या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जळजळीत टीका केली. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यांनुसार वागणाऱ्या उबाठा गटाची दुटप्पी भूमिका दिसली अशी टीका शिंदेंनी केली. सोयीचे राजकारण करणारे वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही असे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातात की राहुल गांधी सांगतील ते करतात हे पहावे लागेल अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
वक्फ बोर्डाचं सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव? खासदार निलेश लंके आक्रमक