Video : अजुनही मित्र होऊ शकतो; श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटाला थेट लोकसभेत ऑफर…

Video : अजुनही मित्र होऊ शकतो; श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटाला थेट लोकसभेत ऑफर…

Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. तर यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाकरे गटाला लोकसभेत थेट ऑफर दिलीय.

शिवसेना आणि माझे नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मी या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतो. हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. आधी कलम 370, नंतर तिहेरी तलाक आणि सीएए आणि आता गरिबांच्या कल्याणासाठी हे विधेयक या सभागृहात आणले गेलंय. इथे माझे काही साथी, दरम्यान सभागृहात आवाज आला पुराने साथी…यावर श्रीकांत शिंदे म्हणाले की अजूनही आपण साथी होऊ शकतो. त्यानंतर त्यांनी विचारलं आज हिरवी जॅकेट बुधवार आहे म्हणून घातलं की, वक्फसाठी विशेष घातलं आहे?

Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला

संसदेत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव गटाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. यूबीटी शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या अंर्तआत्म्याला विचारावं की, जर बाळासाहेब आज इथे असते तर ते इथे हे भाषण देऊ शकले असते का? आज हे स्पष्ट झालंय की, यूबीटी कोणाच्या विचारसरणीचे पालन करत आहे. या विधेयकाला विरोध करत आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गट औरंगजेबाच्या विचारधारेवर चालत असल्याचा आरोप केलाय. जर बाळासाहेब जिवंत असते तर वक्फ विधेयकावर उद्धव गटाचा हा दृष्टिकोन पाहून त्यांना नक्कीच वाईट वाटले असते. आपण मतांसाठी नाही तर देशासाठी जगणारे लोक आहोत. वक्फच्या नावाखाली वर्षानुवर्षे भ्रष्टाचार सुरूच होता. आता नवीन वक्फ विधेयकामुळे हा भ्रष्टाचार थांबेल, असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय.

शिवसेना (यूबीटी) खासदार अरविंद गणपत सावंत म्हणाले होते की, ईदच्या वेळी सौगत-ए-मोदी सुरू होते. आज सौगत-ए-बिल सुरू आहे. ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केलं नाहीये, तेच आज सरकार चालवत आहेत. मुस्लिमांनीही स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि अंदमानात राहिले. मुस्लिम मंडळात अल्पसंख्याक होतील. मंडळात महिलांसाठी आधीच आरक्षण आहे. तुम्हाला बोर्डावर हव्या असलेल्या दोन बिगर-मुस्लिमांविषयी आम्हाला शंका आहे. पूर्वी बोर्डात निवडणुका होत असत, आता तुम्ही नामांकन करणार आहात. मला भीती वाटते की तुम्ही एखाद्या हिंदू मंदिराच्या मंडळातही बिगर-हिंदूला आणण्याचा प्रयत्न कराल. शिवसेना याला विरोध करेल. तुमचा उद्देश काय आहे? उद्या तुम्ही शिखांच्या गुरुद्वारा आणि ख्रिश्चन चर्चमध्येही असेच करू शकता. कलम 370 रद्द झाले तेव्हा आम्ही एकत्र होतो, आम्ही त्याचे अभिनंदन केले.

धक्कादायक! सुनेनं केली सासूची हत्या…मृतदेह गोणीत भरला, जालन्यात भयंकर घडलं

काश्मीरमध्ये किती हिंदू आले आहेत, प्रामाणिकपणे सांगा. हिंदू मंदिरांची जमीन विकली जात आहे, त्यांच्यावरही कायदा आणाल का? 2009 आणि 2014 च्या जाहीरनाम्यात तुम्ही लिहिले होते की भाजप, रहमान खान यांच्या अध्यक्षतेखालील जेपीसी अहवालाची तपासणी करेल आणि वक्फ मालमत्तेवरील बेकायदेशीर कब्जा हटवण्यासाठी मुस्लिम धार्मिक नेत्यांशी चर्चा करेल. तुम्ही ज्या पद्धतीने हे विधेयक आणले आहे ते पाहता, तुमचा उद्देश स्पष्ट नाही. तुम्हाला जमीन बळकावायची आहे. हे कोणासाठी आणि कोणत्या उद्योगपतीसाठी करायचे आहे, हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही घोषणा दिली होती की जर आपण फाळणी केली तर आपण विभागले जाऊ, जर तुम्ही फूट पाडत असाल तर तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी फूट पाडत आहात. तुमच्या मनात द्वेष आहे, तो बाहेर फेकून द्या, असं देखील अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube