साखरपुडा ठरला! प्री-वेडिंग झालं…. लग्नापूर्वी नवरीने दिली नवऱ्या मुलाच्या हत्येची सुपारी, 5 जणांना अटक

साखरपुडा ठरला! प्री-वेडिंग झालं…. लग्नापूर्वी नवरीने दिली नवऱ्या मुलाच्या हत्येची सुपारी, 5 जणांना अटक

Pune Crime News Bride Give Grooms Killing Contract : पुण्यातून (Pune) पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाआधीच साखरपुडा अन् प्रीवेडिंग शुट झालं होतं. परंतु नवरीला मात्र नवरदेव पसंत नव्हता, त्यामुळे तिने नवऱ्याच्या हत्येचा भयंकर कट (Crime News) रचला. लग्न मोडण्यासाठी तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचाच निर्णय घेतला. त्याला मारण्याची सुपारी (Bride Give Grooms Killing Contract) दिली होती. पोलिसांनी या कारस्थानाचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, परंतु सुपारी देणारी नवरी मात्र फरार झालीय.

ठरलंय! पण कधी? कुठे? कसं? “अशी ही जमवा जमवी” चा मजेदार ट्रेलर प्रदर्शित….

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील अहिल्यानगर येथील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्याशी ठरला होता. कुटुंबियांनी सर्व तयारी केली, साखरपुडा झाला आणि लग्नापूर्वीचे शूटही झाले. सगळं काही ठीक चाललं होतं, पण दरम्यान मयुरीने तिचा विचार बदलला. तिला सागर आवडत नव्हता, त्याच्याशी लग्न करायचे नव्हतं. परंतु लग्न मोडल्याने बदनामी होईल, म्हणून तिने हा धक्कादायक कट रचला.

या भयानक कटात मयुरीने तिचा एक सहकारी संदीप गावडे याला सामील केले. दोघांनी मिळून सागर कदमला मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. याप्रकरणी इतर काही लोकांचा देखील समावेश होता. सागर हा कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील रहिवासी आहे. तो एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करतो. 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो कामावरून परतत असताना दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील यवत पोलीस हद्दीतील एका हॉटेलजवळ काही लोकांनी त्याला अडवले. हल्लेखोरांनी सागरवर काठ्यांनी हल्ला केला. त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर तेथून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या सागरने कसं तरी स्वतःला सावरत घटनेची पोलिसांना माहिती दिली.

चित्रपट प्रदर्शित करुनच दाखवा, खुलं चॅलेंज; पाकिस्तानी चित्रपटावरुन मनसे आक्रमक

यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू झाला. पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला, तेव्हा संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे आणि इतरांची नावे समोर आली. पोलिसांनी त्याला श्रीगोंदा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला. त्याने सांगितले की हे सर्व मयुरी दांगडेच्या सूचनेवरून केले गेले.पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. आदित्य शंकर दांगडे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे, परंतु कटाची सूत्रधार वधू अजूनही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.

माझं लग्न मयुरीसोबत ठरलं होतं. 12 मार्च रोजी लग्न होणार होतं. 26 फेब्रुवारीला प्रीवेडिंग शुट झालं होतं. 27 फेब्रुवारीला तिने मला मूव्ही बघायच्या निमित्ताने बोलावून घेतलं होतं. मी सिनेमा पाहून आल्यावर तिला घरी सोडलं. त्यानंतर एक-दीड किलोमीटर पुढे गेल्यावर खामगाव फाट्याजवळ एक चारचाकी गाडी आली. तिच्यातून तिघेजण उतरले. त्यांनी मला लाकडी दांड्याने मारायला लागले. मयुरीसोबत लग्न करू नको, केल्यास तुला मारून टाकू असं म्हणत होते. त्यानंतर माझ्या पायाला फॅक्चर झालं होतं, असं मयुरने सांगितलंय.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील खामगाव परिसरात गाडी आडवी घालून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तपास करत असताना एका संशयिताला पकडलं. तपासात समोर आलं की, एका तरूणीने तिला होणारा नवरा आवडत नसल्याने त्याला मारण्यासाठी सहा लाखांची सुपारी दिली होती. या प्रकरणात सहा लोकांचा समावेश आहे, तर सुपारी देणारी मुलगी फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube