Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी राजेंद्र गिरी

Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी राजेंद्र गिरी

Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राजेंद्र गिरी यांच्या सामाजिक कार्याची व मानव सेवेची आवड याची दखल घेऊन मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे, सचिव अरुण पांडव, कोषाध्यक्ष संगीता साबणकर, सह सचिव गोविंद अग्रवाल तसेच महाराष्ट्र अध्यक्ष कैलास शिंदे तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सर्वानुमते राजेंद्र गिरी यांची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे कार्य
– कोरोना काळात समाजाच्या कल्याणासाठी महान शिवशक्ती यज्ञाचे आयोजन, यावेळेस महाराष्ट्रातून संघटनेचे जवळ जवळ 50 पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. तीन दिवस चाललेल्या या यागाच्या सांगते प्रसंगी चारशे ते पाचशे भाविकांना भोजन देण्यात आले.

‘राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या’; शासकीय कंत्राट भरतीच्या निर्णयावर छावा संघटना आक्रमक

– नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावर ज्या लीज पेंडन्सी नोंदवलेल्या होत्या, २०१८ च्या जी आर नुसार त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, त्या काढण्यासाठी विनंती करण्यात आली व त्यानुसार त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश करून त्या काढण्यास सांगितल्या.

– वृक्षतोड थांबवण्यासाठी नासिक महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यातील बरेच वृक्ष वाचविण्यात आपणास यश आले.

– शासनाच्या कार्यालयातील दप्तर दिरंगाई थांबवण्यासाठी निवेदन देऊन त्यात सुधारणा करण्यात आल्या.

– उपनिबंधक कार्यालयामध्ये जे दस्त नोंदवले जात होते, ती प्रणाली अतिशय धीम्या गतीने असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यात तात्काळ सुधारणा करण्यात आल्या, जसे बॅटरी बॅकअप, फास्ट नेटची सुविधा, पुरेसे मनुष्यबळ इत्यादी.

पोटात एक आणि ओठात एक हा तुमचा स्वभाव, आजोबांची पूर्ण हयात…; भाजपची आदित्य ठाकरेंवर टीका

– वृद्ध कलावंतांचे मानधन त्वरित वितरित करण्यात यावे, त्यासाठी समितीची नेमणूक तात्काळ करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तेही काम मार्गी लावले.

– नगर जिल्ह्यातील व्यक्तीवर पोलिसांकडून झालेल्या अन्यायाप्रसंगी नाशिक येथील डीआयजी ऑफिसला सर्व कार्यकर्त्यांसह जाऊन निवेदन दिले.

याव्यतिरिक्त अनेक कामे नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या माध्यमातून करण्यात आली असून, पुढेही मानव कल्याणच्या दृष्टिकोनातून ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष गजू नाना इंगळे व नाशिक जिल्हा कार्यकारिणीला बरोबर घेऊन कामे केली जातील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube