“देवेंद्र यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, तर त्यांनी…” एकनाथ शिंदेनी केलं फडणवीसांचं कौतूक

  • Written By: Published:
devendra fadnavis & eknath shinde

“देवेंद्र फडणसवीस यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, त्यांनी ती पूर्ण देखील केली. त्यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाचं हॉस्पिटल येतेच उभे राहिले आहे.”असं वक्तव्य मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नागपूर येथील डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत उपस्थित होते.नागपुरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे.

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “देवेंद्र फडणसवीस यांनी फक्त संकल्पना ठेवली नाही, त्यांनी ती पूर्ण देखील केली. त्यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाचं हॉस्पिटल येतेच उभे राहिले आहे. असं कौतुक मुख्यंमत्री शिंदे यांनी यावेळी फडणसवीस यांचं केलं.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, “या रुग्णालयात गरिबांची सेवा व्हावी. यासाठी या इन्स्टिट्यूटची उभारणी करण्यात आलेली आहे. गरिबांच्या सेवेच्या उद्देशाने इन्स्टिट्यूटची स्थापना केली. २५ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं आहे. रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूटचं काम पूर्ण झालं. सरसंघचालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. शैलेश जोगळेकरांचं कार्यात मोठं योगदान आहे.” असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा

Tags

follow us