तलवारीने केक कापणं गुन्हा होऊ शकत नाही; व्हायरल व्हिडिओवर शिंदेंच्या शिलेदाराचं उत्तर
Sanjay Gaikwad : बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड यांनी चक्क तलवारीने केक कापून मुलाला आणि कार्यकर्त्यांना भरवला. मुलाच्या वाढदिवशी बापाचा हा कारनामा पाहून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आता या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही असे गायकवाड यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं होतं?
बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रात्री झालेल्या या कार्यक्रमात आ. गायकवाड यांनी तलवारीने केक कापला होता. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला. या व्हिडिओत आ. गायकवाड तलवारीने केक कापताना दिसत आहेत. नंतर हा केक कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्त्यांना भरवतानाही दिसत आहेत.
संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्याने ते काहीही बरळतात; वंचितचा हल्लाबोल
यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलीस प्रशासनाने असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले ते माझ्या मते चुकीचे आहेत. कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला धमकावण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो.
काही व्यासपीठांवर राजकीय पुढार्यांना तलवारी गिफ्ट दिल्या जातात त्यावेळी नेते मंडळी तलवार उंचावून दाखवतात. त्या कुणाला मारण्यासाठी दाखवतात का ? तलवार शौर्याचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवले जाते. तलवार दाखवण्याने जर गुन्हा होतो तर पोलीस परेडमध्ये एखादा डीवायएसपी हजारोंच्या गर्दीला ती तलवार दाखवतो तो त्याचा सॅल्यूट करतो तो का मारायला दाखवतो का ? आणि असं असेल तर मग ऑलम्पिकचे गेम पिस्तूल बंद करावे लागेल. तलवारबाजी बंद करावी लागेल हे सर्व बंद करावे लागणार आहे. ज्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे मारण्याचा कापण्याचा असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर आम्ही हायकोर्टात गुन्हा क्रॅश सुद्धा करू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
मी वाघासारखं जगलो, तुझी शिकार तर नक्की करणार; संजय गायकवाडांचा तुपकरांना इशारा