Bhavana Gawali : खासदार भावना गवळींना धक्का! आयकर विभागाने संस्थेचे खातेच गोठवले

Bhavana Gawali : खासदार भावना गवळींना धक्का! आयकर विभागाने संस्थेचे खातेच गोठवले

Shivsena MP Bhavana Gawali : शिवसेनेत फूट पडली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या देखील शिंदे गटाबरोबर आल्या. त्यांच्या या निर्णयानंतर अडचणी कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र तसे काही घडले नाही याचा प्रत्यय आला आहे. खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. भावना गवळी यांना धक्का देणारीच ही बातमी आहे. आयकर विभागाने 29 डिसेंबर रोजी खासदार भावना गवळी यांना एक नोटीस धाडली होती. 5 तारखेपर्यंत गवळी यांना या नोटिसला उत्तर द्यायचे होते. मात्र त्यांनी प्रतिनिधी पाठवून उत्तर दिले होते. तरीदेखील आयकर विभागाचे समाधान झाले नाही.

भावना गवळी ईडीनंतर आता आयकर विभागाच्या रडारवर, 18 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नोटीस

गवळी यांनी 8 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे बँक खाते गोठवले आहे. आता या खात्यातून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. कलम 226 (3) अंतर्गत विभागाने ही कारवाई केली नाही. गवळी यांच्या संस्थेवर याआधीही छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर विभागाने नोटिस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. 8.26 कोटींच्या थकबाकीप्रकरणी गवळी यांना म्हणणे मांडायचे  होते. परंतु, गवळी यांनी स्वतः हजर न राहता प्रतिनिधी पाठवला. प्रतिनिधीच्या म्हणण्यावर आयकर विभागाचे समाधान झाले नाही.

याआधी संस्थेतून 24 कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार गवळी यांनी 12 मे 2020 रोजी रिसोड पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र त्यानंतर आयकर भरला नसल्याचीही बाब समोर आली होती. यानंतर आयकर विभागाने गवळी यांना नोटीस बजावली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर निशाणा साधला होता. सोमय्या यांनी प्रश्न उपस्थित करत गवळींकडे एवढा पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी केली होती. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये 18 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.

उद्धव ठाकरेंना नात्यांचे महत्त्व कळत नाही; ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं प्रत्युत्तर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube