बच्चू कडू अमरावतीसाठी आग्रही पण.. प्रहारची ‘ती’ ऑफर राणांनी फेटाळली!
Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट दावा केला आहे. लोकसभेला अमरावती आणि अकोल्याची जागा मागू शकतो. त्याचबरोबर अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही, असेही आमदार कडू यावेळी म्हणाले. त्यावर बच्चू कडू हे महायतीचा धर्म पाळतील असं म्हणत आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता नवीनच चर्चांना उधाण आलं आहे.
Exp : सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या CBI किंवा SIT चौकशीचे आदेश का दिले नाही?
यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, आमचा फोकस विधानसभेवर असणार आहे. आम्ही विधानसभेच्या 15 जागा लढवण्याची तयारी करत आहोत. लोकसभेच्या जागावाटपासाठी 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आमची बैठक आहे. त्यामध्ये आम्ही किमान दोन जागा मागणार आहोत. त्याचवेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर लढल्या तरी काय हरकत आहे? असाही सवाल यावेळी आमदार कडू यांनी उपस्थित केला आहे.
Video : ट्रक चालकांची ‘औकात’ काढणं अंगलट; CM मोहन यादवांकडून जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खासदार नवनीत राणा प्रहारच्या तिकिटावर लढण्यासाठी तयार होतील का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांकडून आमदार कडू यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, प्रहारच्या तिकिटावर लढण्यासाठी त्या तयार नाही झाल्या तर ठिक आहे. आमची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी नाही, 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आमची एक बैठक घेऊन दोन तीन ठिकाणी चांगले उमेदवार आहेत. नुसत्याच जागा मागून चालत नाही, ते उमेदवार निवडूनही आल्या पाहिजेत. त्यामुळे जिथं आम्हाला चांगला उमेदवार मिळेल, त्या ठिकाणी आपण लढू असेही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितल्या.
आमदार बच्चू कडू यांच्या ऑफरवर खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी ते म्हणाले की, खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमानी पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. प्रहारने जी ऑफर दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद पण नवनीत राणा या अमरावती जिल्ह्यात खासदार आहेत. त्या महायुतीच्या सोबत आहेत, म्हणून मला असं वाटतं की, आमदार बच्चू कडू हे महायुती धर्म पाळतील, असं म्हणत आमदार कडूंना आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.