“साहेब सावध राहा, तुमच्या मुलाची..” शिंदे गटाच्या नेत्याला निनावी पत्र; राजकारणात खळबळ!

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अतिशय धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आताही अशीच धक्कादायक घडामोड समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना एक निनावी पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांच्या मुलाच्या हत्येचा कट शिजत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांचा धाकटा मुलगा मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका असल्याचे या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे याआधी दोनदा असे पत्र मिळाले होते. आता तिसऱ्यांदा पत्र मिळालंय. त्यामुळे आता या प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.
पत्रात काय नेमकं काय?
तुम्हाला पत्र लिहिण्याचं कारण की तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी व त्यांचा भाऊ रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमच्या धाकट्या मुलाला मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याची त्यांनी सुपारी बांधून घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांची अशी मिटींगही झाली आहे. तरी आपण व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे.
प्रतापराव जाधवांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केलं, संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
मी त्याच्या जवळची व्यक्ती असून मी प्रकट स्वरुपात येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे. वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही.
टीप – वरील मजकूर हा खोटा नसून सत्य आहे. यामध्ये माझा कोणताच वैयक्तिक फायदा नसून केवळ तुमच्या कुटुंबाप्रती काळजी आहे. म्हणून पत्राद्वारे तुम्हाला कळवत आहे. मृत्यूंजय दादांची काळजी घ्या. आपला शुभचिंतक असा मजकूर या पत्रात आहे.
संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, संजय गायकवाडांची बोचरी टीका