Video : खुद्द फडणवीसही रोहित पवारांवर खुश; ह्रदय मोठंय म्हणत मानले आभार

  • Written By: Published:
Video : खुद्द फडणवीसही रोहित पवारांवर खुश; ह्रदय मोठंय म्हणत मानले आभार

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे (Rohi Pawar) आभार मानले आहे. रोहित पवारांनी केलेल्या ट्विटवर फडणवीसांनी रोहित पवारांचे ह्रदय मोठं असून, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असे फडणवीसांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी बावनकुळेंच्या मुलाच्या गाडी अपघातावरही भाष्य केले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis On Rohit Pawar Tweet)

Video : देवेंद्र फडणवीस यांना अजिबात रोमान्स कळत नाही, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आज (दि.10) एक्सवर एक पोस्ट केली होती. ज्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीतील अन्य पक्षांना किती जागा मिळतील याबाबतची आकडेवारी नमुद केली आहे. त्यावर बोलतान फडणवीस म्हणाले की, रोहित पवारांनी जर आम्हाला 37 जागा दिल्या असतील तर, त्यांचे ह्रदय किती मोठं आहे यासाठी त्यांचे धन्यवाद असे फडणवीसांनी म्हटले आहे.

रोहित पवारांचे ट्विट नेमकं काय होतं?

रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे. ज्यात अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

अजितदादांना ऑफर

पुढे रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय.

लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर

कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक इंटेरेस्टिंग होणार

पुढे रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडबाबतही लिहिले आहे. ते म्हणतात की, कर्जत_जामखेड संदर्भात तर “कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको”, असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

‘महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नकोतच’; अजितदादांना कोणत्या संकटाची चाहूल?

बावनकुळेंना टार्गेट करून राजकारण करणे चुकीचे 

यावेळी फडवीसांनी नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, नागपूर अपघात प्रकरणाची प्रकरणाची पूर्ण चौकशी पोलीस करत आहेत.यामध्ये एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली असून, ज्या प्रकारे या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करण्याचा विचार करुन राजकारण केले जात आहे ते चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube