Video: भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; प्रश्न विचारल्यामुळे तरुणाला धक्काबुक्की

  • Written By: Published:
Video: भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; प्रश्न विचारल्यामुळे तरुणाला धक्काबुक्की

Prashant Bamb : गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत एकच गोंधळ झाला. गवळी शिवरा गावात 2 तरुणांनी बंब यांना प्रश्न विचारले. रेल्वे आणू असं तुम्ही म्हंटलं होतं, त्याचं काय झालं? (Prashant Bamb ) असा प्रश्न तरुणांनी विचारला असता यावरुन सभेत गोंधळ झाला. यावर बंब यांनी उत्तर दिलं, मात्र तरीही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं सभेला उपस्थित नागरिक आणि तरुण यांच्यामध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली.

छत्रपती संभाजीनंगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला. काही काळानंतर वातावरण शांत झालं. यावेळी प्रशांत बंब यांना प्रश्न विचारला असता, विरोधक मुद्दामून अशी काही लोक गेल्या काही दिवसांपासून पाठवत आहेत. सभेत वारंवार गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं प्रशांत बंब म्हणाले.

Water Grid : फडणवीसांचा वॉटर ग्रीड प्रकल्प दुष्काळ संपवणार अन् मराठवाडा सुजलाम सुफलाम करणार

गंगापूर खुलाताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ झाला. सभेसाठी उपस्थित असलेल्या तरुणांनी रेल्वेबाबत प्रश्न विचारल्यामुळे सभेत गदारोळ झाला. सभेला उपस्थिती नागरिक आणि तरुणांमध्ये मोठा वाद झाला. याबाबत सभेत गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप सभेनंतर प्रशांत बंब यांनी केला आहे.

यापूर्वीही प्रशांत बंब यांच्या सभेत गदारोळ झाला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील वेरूळमध्ये हा प्रकार काल घडला. यावेळी बराच गोंधळ उडाला आणि प्रकरण बाचाबाचीपर्यंत पोहचले. खुलताबाद तालुक्यात निवडणूकीचे वातावरण चांगलंच तापलं आहे. तालुक्यातील सराई-सालुखेडा, वेरुळ, कसाबखेडा येधील प्रचार दौऱ्यात आमदार प्रशांत बंब यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत नागरिक त्यांना पंधरा वर्षांचा लेखाजोखा मागितला होता. त्यावेळीही मोठा गदारोळ झाला होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube