Vinod Tawde : ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र; मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नांवर तावडेंच उत्तर

  • Written By: Published:
vinod tawde

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेच्या सत्तसंघर्षाच्या लढाईचा निकाल अद्यापही रखडून आहे. त्यातच भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाऐवजी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आता जोरदार रंगली आहे. या चर्चेवर आता विनोद तावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, मी केंद्रीय राजकारणात बरंच काही शिकायला मिळतंय, त्यामुळे मी तिकडेच खूश आहे. मी केंद्राच्या राजकारणात काम करणार”, असे म्हणत ‘भावी मुख्यमंत्र्यांच्या’ चर्चेवर पडदा टाकला आहे.  ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत तावडेंनी हे वक्तव्य केलं आहे.

Sanjay Raut : केंद्राने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण..,

2019 सालच्या निवडणुकीत विनोद तावडे यांचे तिकीट देवेंद्र फडणवीस यांनी कापल्याची चर्चा होती. नंतरच्या काळात विनोद तावडे यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपदी वर्णी लागली आणि केंद्रातल्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले, पण अधूनमधून ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा असतात.

भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात तुमचा चेहरा असेल का? या सोशल मीडियावरील चर्चेबाबत विचारलं असता विनोद तावडे म्हणाले, “यामध्ये अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांची एक टीम आहे. हेच लोक टीम म्हणून महाराष्ट्रात काम करतील. मला महाराष्ट्रात येण्यात काहीही रस नाही, हे मी मनापासून सांगतो. मला केंद्रातल्या राजकारणातच काम करायला आवडेल”

Amritpal Case : काय आहे हेबियस कॉर्पस, ज्यावर हायकोर्टाने सरकारला बजावली नोटीस, जाणून घ्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube