हवालदार पोलीस स्टेशनमध्येच लाच घेत होता, ACB चे येताच पळ काढला, गुन्हा दाखल

हवालदार पोलीस स्टेशनमध्येच लाच घेत होता, ACB चे येताच पळ काढला, गुन्हा दाखल

श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांत लाच (Bribe) घेण्याच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली. काही दिवसांपूर्वी नाशिक शिक्षण विभागातील एका अधिकारी महिलेला पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पडले होते. अशीच एक घटना आता श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यातही (Belwandi Police Station) घडली. पोलिस हवालदार ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे (Dnyaneshwar Raosaheb Pathare) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मात्र लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्याचे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या उसाच्या शेतीचा आधार घेत धूम ठोकली. (A case has been registered against a police constable of Belwandi police station for taking bribe…)

सविस्तर माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दि २१ रोजी बेलवंडीत ही कारवाई केली. या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार, त्याची पत्नी, मुलगी व मुलगा यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात १ जून रोजी गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींना १३ जून रोजी झालेल्या जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासातील सहकार्य करण्यासाठी पोलिस हवालदार ज्ञानेश्वर पठारे याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे कबूल करण्यात आले होते. तक्रारदार यांनी या बाबत पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

भारत-अमेरिकेचं संविधान लोकशाहीवर आधारित, व्हाईट हाऊसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधित 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार आणि पोलिस हवालदार यांच्यात ठरल्याप्रमाणे बुधवार दि.२१ रोजी तक्रारदार हा पोलिस हवालदाराला पैसे देण्यासाठी पंचासमक्ष गेला असता पोलिस हवालदार पठारे याने ती रक्कम पोलिस ठाण्याच्या पाठीमागे असणाऱ्या खोलीतील कपाटात ठेवण्यास सांगत ती स्वीकारली. मात्र त्याच वेळी लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्याचे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या उसाच्या शेतीचा आधार घेत धूम ठोकली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube