पुढील चार तासांत अहमदनगरमध्ये वादळी पाऊस…

पुढील चार तासांत अहमदनगरमध्ये वादळी पाऊस…

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा कोसळणार असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Video : पुणे महापालिकेसमोर सदाभाऊ खोतांचा हायहोल्टेज ड्रामा; गेटवर चढून…

तसेच विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे, धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत राज्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, गहू, हरभरा, कांदा, बाजरी, चारापिके, द्राक्षे, टरबूज या पिकांचं नूकसान झालं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube