Bhaiyya Gandhe : ओरिजनल निष्ठावंत भाजपचाच कार्यकर्ता आमदार व महापौर होईल

Bhaiyya Gandhe : ओरिजनल निष्ठावंत भाजपचाच कार्यकर्ता आमदार व महापौर होईल

अहमदनगर : आगामी काळात राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. शिवाय, पुढील वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी आतापासून अनेक पक्षांनी तयारीला जोरदार केली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचाच आमदार आणि महापौर होईल, असं विधान भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे यांनी केलं.

आज भाजपचा 45 वा स्थापना दिन अहमदनगर शहरात साजरा झाला. शहरातील लक्ष्मी कारंजा चौकातील पक्ष कार्यालयात व सावेडीच्या संपर्क कार्यालयात विविध उपक्रमांनी भाजपचा स्तापना दिना उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकावण्यात आला. यावेळी भारत माता व भाजपाच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भैय्या गंधे बोलत होते. यावेळी बोलतांना गंधे म्हणाले की, १९७८ साली भारतीय जनता पार्टीचे लावलेले छोटेसे रोपटे आज पूर्ण देश व्यापणारा महाकाय वटवृक्ष झाला आहे. नगर शहरातही पक्ष आज मजबूत स्थितीत आहे. नगर शहर हे हिंदुत्ववादी विचारांना मानणारे शहर आहे. तसेच भाजपाच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक व विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बरोबर घेऊन जिंकेल. ओरीजनल निष्ठावंत कार्यकर्ताच भाजपाचाच आमदार व महापौर होईल, असं त्यांनी सांगिलतं.

रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोग असमाधानी

ते म्हणाले की, येणाऱ्या काळात नगर शहराचे सर्व महत्वाचे निर्णय पदाधिकारी घेतील. भाजपाचे कार्यकर्ते व्यक्तीपेक्षा पक्षाच्या विचारावर प्रेम करणारे आहेत. या कार्यकर्त्यांच्या भक्कम पायावर पक्ष आज मजबूत स्थितीत उभा आहे.

यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा शिर्डी येथील नियोजित दौरा, शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बूथ सशक्तिरण अभियान शहर प्रवास आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

यावेळी माजी शहर अध्यक्ष वसंत लोढा म्हणाले, आज देशातील २८ पैकी १६ राज्यांमध्ये भाजप स्वबळावर सत्ताधारी आहे. देशातील सर्वात मोठा पक्षा असलेल्या भाजपाचे चारशेहून अधिक खासदार आहेत. तसेच पाच हजाराहून अधिक आमदार पक्षाचे आहेत. कित्तेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी खस्ता खात प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामांमुळेच पक्ष आज यशाच्या शिखरावर पोहचला आहे. पक्षाच्या या वैभवात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा सहभाग आहे.

माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी हनुमान जयंती व पक्षाच स्थापना दिन एकाच दिवशी येणे हा मोठा दुग्धशर्करा योग असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठनेते अनिल गट्टानी यांनी जुन्या आठवणी व घटनांना उजाळा दिला. माजी उपमहापौर मानल ढोणे यांनी शुभेच्छा दिल्या. संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस महेश नामदे यांनी आभार मानले.

यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अजय चितळे, पंकज जहागीरदार, ज्ञानेश्वर काळे, महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रिया जाणवे, संजय ढोणे, नरेंद्र कुलकर्णी, सुमित इपलपेल्ली, बाळासाहेब भुजबळ, सुनील सकट, मयूर ताठे, दत्ता गाडळकर, नितीन शेलार, राहुल रासकर, गोपाल वर्मा, लक्ष्मिकांत तिवारी, प्रशांत मुथा, सचिन पावले, प्रदीप परदेशी, संतोष गांधी, चंद्रकांत पाटोळे, ज्ञानेश्वर धिरडे, शिवाजी दहीहंडे, एम.डी.मैड, सुजित खरमाळे, कुसुम शेलार, लीलाबाई अग्रवाल, रेखा मैड, रेखा विधाते, पुष्कर कुलकर्णी, अशोक भोसले, दिलीप जाधव ,सुनील सरोदे, पोपट भोसले, संपत नलावडे, करण भळगट, जालिंदर शिंदे, राहुल बुधवंत, अभिषेक सोनावणे, सुनील तावरे, जितु डापसे, अभिजित ढोणे, मिलिंद भालसिंग, निशांत दातीर, सागर चिंधे, मयूर जोशी, सौ.करंदीकर आदी उपस्थित होते.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube