पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तडे; ‘हा’ बडा नेता करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीतील तिन्ही पक्ष दिशाहीन झाले आहेत. यातच आता काँग्रेसला धक्का देणारी बातमी आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवार गटाप्रमाणेच काँग्रेसलाही खिंडार पाडण्याचे नक्की केले आहे. तसेच घडू लागले आहेत. साताऱ्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर राजकारणात ही घडामोड घडली तर काँग्रेससाठी मोठा (Congress Party) धक्का ठरू शकतो.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उंडाळकर पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. विलास काका उंडाळकर यांचे पुत्र आहेत. आता उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आहे. पंरतु, येथे काँग्रेसला तडे जात आहेत. उंडाळकर पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश करावा असे सांगितले आहे.
काँग्रेसला धक्का! दिल्लीत उद्धव ठाकरेंचा ‘आप’ला पाठिंबा; इंडिया आघाडीला तडे?
महायुतीत सध्या भाजप सर्वात प्रबळ पक्ष आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्या पक्षांचीही ताकद वाढली आहे. तरीदेखील या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मोहीमच सुरू केली आहे. शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर सुरू असून या मोहिमेत उद्धव ठाकरे गटातील (Shivsena UBT) नेते पदाधिकारी फोडले जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांनीही शरद पवार गटातील बरेच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले आहेत. आता काँग्रेसला धक्के दिले जात आहेत.
दरम्यान, पक्षप्रवेशा संदर्भात अॅड. उदयसिंह उंडाळकर पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेशाचा मुहूर्त अजून ठरला की नाही याची माहिती समोर आलेली नाही. परंतु, उंडाळकर पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता या पक्षप्रवेशाला अजित पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धनंजय मुंडेंनंतर आता मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री फडणवीस अन् अजित पवारांकडे, केली मोठी मागणी