जिल्हाध्यक्षपदाची धुरा येताच आगरकरांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, पक्ष मजबूत…

जिल्हाध्यक्षपदाची धुरा येताच आगरकरांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, पक्ष मजबूत…

Abhay Agarkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अहमदनगर जिल्ह्यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यावर सोपवण्यात आलीय. पक्षानं जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे. या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी माझ्याकडून नक्की केली जाईल. आगामी काळात ज्या निवडणुका आहेत यासाठी संघटन कसे बांधले जाईल, तसेच पक्ष मजबूत कसा केला जाईल या अनुषंगाने आमचे प्रयत्न असणार आहे, असा विश्वास यावेळी आगरकर यांनी बोलून दाखवला.

धर्मगुरूंची हत्या! नगरच्या ‘या’ आमदारांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट…

राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपने नगर जिल्ह्यात काही विचारात्मक महत्वाचे फेरबदल केले आहेत. भाजपने नगर जिल्ह्यातील विद्यमान तीनही जिल्हाध्यक्षांना डच्चू देत त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यातच नगर शहर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.

कर्डिले यांनी डाव टाकला ! काँग्रेसच्या माजी खासदाराचा नातू भाजपमध्ये

दरम्यान, आगरकर हे संघाशी निगडित असून लंघे हे विखे समर्थक आहेत, तर भालसिंग हे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे समर्थक आहेत. दरम्यान नवी जबाबदारी मिळाल्यानंतर आगरकर म्हणाले, पक्षाने जी मला जबाबदारी दिली आहे त्याला सार्थ ठरेल अशी कामगिरी मी करेल.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तसेच पक्ष संघटन यासाठी पक्षाकडून वेगवेगळ्या भूमिका या घेतल्या जात असतात. तळागाळातील माणसाचा उद्धार झाला पाहिजे, असा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असून तोच उद्देश आम्ही देखील पुढे घेऊन जाऊ. आगामी काळात ज्या निवडणुका आहेत, यासाठी संघटन कसे बांधले जाईल, तसेच पक्ष मजबूत कसा केला जाईल, याअनुषंगाने आमचे प्रयत्न असणार असल्याचं आगरकरांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube