धनुष्यबाण मिळाल्याबद्दल अहमदनगर शहरात शिंदे गटाकडून फटाके फोडून जल्लोष

  • Written By: Published:
धनुष्यबाण मिळाल्याबद्दल अहमदनगर शहरात शिंदे गटाकडून फटाके फोडून जल्लोष

अहमदनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण (dhanushyaban) चिन्ह दिले आहे. त्यानंतर अहदनगरमधील शिवसैनिकांकडून शिवायल येथे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती देण्याची निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना विनंती केली होती. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्याचबरोबर शिवसेना हे पक्षाचे नाव सुद्धा एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटात नाराजी पसरली, तर शिंदे गटात मोठा आनंद आणि जल्लोष साजरा केला जात आहे.

शिंदे गटाच्या वतीने नगर शहरांमध्ये शिवालय येथे हिंदू धर्म रक्षक दिवंगत अनिल भैय्या राठोड यांच्या प्रतिमेस चितळे रोडवरील शिवालय येथे पुष्पहार करण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने पेढे वाटून आणि फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यास शिवसेना कटीबद्ध आहे, असेही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

नगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरेतर खूप समर्थन मिळाले. त्यानंतर आता त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे. खरी शिवसेना आमचीच आहे हा आम्हाला विश्वास होता आणि बाळासाहेबांच्याच विचाराने पुढे नेत आहोत. निवडणूक आयोगाने खऱ्या शिवसैनिकाला हे चिन्ह आणि नाव दिले, हा सत्याचाच विजय असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

Ram Shinde : रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील पाठलाग संपेना..

यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे सुनील लालबोंद्रे, अमोल हुंबे, बाबू शेठ टायरवाले, सचिन जाधव, आकाश कातोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube