देवेंद्र फडणवीसांचे नगरमध्ये रात्रीचे खलबते ! विखे-शिंदेंच्या वादाचे काय होणार ?

  • Written By: Published:
देवेंद्र फडणवीसांचे नगरमध्ये रात्रीचे खलबते ! विखे-शिंदेंच्या वादाचे काय होणार ?

Devendra Fadnavis Ahmednagar Tour: अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शासकीय दौऱ्याबरोबरच ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तब्बल दोन दिवस ते नगर जिल्ह्यात असणार आहेत. तर एक मुक्कामही ते नगर शहरात करणार आहे. त्यामुळे त्या रात्री जोरदार राजकीय खलबते होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाची तयारी करणे, आमदार राम शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वादावरही या मुक्कामात तोडगा निघण्याची शक्यता आहे.

ठाकरे-केजरीवाल भेटीवर शिंदेंचं उत्तर; म्हणाले, कितीही बैठका घ्या पण, देशात..

भारतीय जनता पक्षाने मिशन २०२४ अंतर्गत सुमारे वर्षभरापूर्वी जिल्ह्यांचे प्रभारी नेते जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली होती. मात्र, तेव्हापासून ते नगरला पक्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आले नव्हते. जिल्ह्यातील इतर भागात त्यांनी दौरे केले आहेत. त्यांनी सभाही घेतल्या आहेत. आता ते २५ व २६ मे असे दोन दिवस ते नगर जिल्ह्यात असणार आहे.

गुड न्यूज ! नगरकरांना लवकरच मिळणार ‘अमृतचे’ पाणी

फडणवीस हे गुरुवारी सायंकाळी नगर शहरात येणार आहेत. नगरमध्ये मुक्कामही ते असणार आहेत. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरून आमदार राम शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखेंवर गंभीर आरोप केला होता. त्याची तक्रारीही शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता. जिल्ह्याचे प्रभारी असलेल्या फडणवीस यांनाही या वादावर तोडगा काढावा लागणार आहे. या वादावरही चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता आहे. नगर विधानसभेची जागा भाजपकडे घेण्याची स्थानिक नेत्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे.

आता राज्यांमध्ये निवडणुका होणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात छत्तीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या वुमन्स अँड चाइल्ड्स हॉस्पिटलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजनानंतर दुपारी बारा वाजता कोहिनूर मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी शिर्डीला मार्गस्थ होणार आहेत व तेथे होणाऱ्या समृद्धी महामार्ग दुसरा टप्पा उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube