आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही; पवारांना भेटताच मोहिते पाटलांचा एल्गार

आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही; पवारांना भेटताच मोहिते पाटलांचा एल्गार

Jayasingh Mohite Patil News : आम्हाला ईडी-बिडीची भीती नाही, आता माढाच नाहीतर सोलापूर आणि बारामतीही जिंकणार असल्याचा एल्गार जयसिंह मोहिते पाटील (Jayasingh Mohite Patil News) यांनी केला आहे. दरम्यान, जयसिंह मोहिते पाटलांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यानंतर मोहिते पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मंडलिकांनी माफी मागावी; सतेज पाटलांचा हल्लाबोल

मोहिते पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली. शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली. सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले, आता फक्त 55 कोटी राहिलेत. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला ईडी-बिडीची भीती नसल्याचं मोहिते पाटील म्हणाले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना उभंच राहू दिलं नसतं, पण आता वेळ निघून गेली असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले

सोलापूर बारामतीत मविआचाच गुलाल :
भाजपने रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देताना पाच आमदार पाठीशी असल्याचं सांगितलं, पण ती त्यांनी चूक केली. आता माढा लोकसभेच्या गुलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गुलालही महविकास आघाडीचा असणार असल्याचं मोहिते पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

भावाकडूनच Hardik Pandya ची कोट्यावधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे ठरले आहे. 14 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्याचबरोबर 16 एप्रिलला त्यांचा माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित निंबाळकर आणि महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube