उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर

उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर

Sharad Pawar on CM Post : विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू केला आहे. आज शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. तसेच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावरही भाष्य केलं.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नियोजन सुरू आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष समान जागांवर लढतील असे सांगितले जात आहे. तसेच इंडिया आघाडीने (INDIA Alliance) लोकसभा निवडणुकीत वापरलेला फॉर्म्युला राज्यात (Lok Sabha Election) विधानसभा निवडणुकीत वापरण्याचा विचार केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्याचा चेहरा घोषित न करताच सामोरं जायचं. निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घ्यायचा असे ठरल्याचे सांगितले जात आहे.

राऊत की जयंत पाटील? शरद पवार, काँग्रेसचं नक्की पण, ठाकरेंचे पत्ते बंद; विधानपरिषदेत डाव कुणाचा?

मात्र दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार (Sanjay Raut) परिषदेत आघाडीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावाच लागेल. मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरे जाणं धोक्याचं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याने उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पाहिलं आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला होाता.

यानंतर आता स्वतः शरद पवार यांनीच यावर भाष्य करत या चर्चांना फुलस्टॉप देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे उत्तर दिले. लोकसभा निवडणूक आम्ही तीन पक्ष एकत्रित लढलो पण या निवडणुकीत आम्हाला अनेक लहान राजकीय पक्षांनी मदत केली . त्यामुळे आगामी विधानसा निवडणुकीत आम्ही या पक्षांनाही संधी देणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

“खिशात 70 रुपये असताना 100 कसे खर्च करणार?” शरद पवारांचा अजितदादांना खोचक सवाल

यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरही खोचक टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोदींनी ज्या मतदारसंघात सभा घेतल्या त्याठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीतही मोदींनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात अशी खोचक टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज