.. तर त्यावेळी फडणवीसांना अटक झाली असती; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने खळबळ!

.. तर त्यावेळी फडणवीसांना अटक झाली असती; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने खळबळ!

Chandrakant Patil on Devendra Fadnavis : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या एन्ट्रीने भाजपासाठी आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी या मतदारसंघावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. काल मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले ज्याची आता चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये सरकार गेलं. मी त्यावेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्यानंतर 33 महिन्यांत काय काय सहन केलं हे आमचं आम्हाला माहिती. कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

Madha Lok Sabha : राष्ट्रवादीची धाकधुक वाढली; आमदार शिंदे बंधुंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी

माढा लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील लढत भाजपसाठी अवघड होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप नेते सक्रिय झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.

ते पुढे म्हणाले, फडणवीसांना अटक होणार होती तेव्हा हेही दिवस जातील असं आम्हाला वाटलं होतं. ते गेले सुद्धा. यानंतर कुणाच्या ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

माढा भाजपसाठी जास्त कठीण

दरम्यान, शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी मंगळवेढा शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन काल केले होते. या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी भाजपसाठी सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याची कबुली दिली. तर, दुसरीकडे सर्व्हेचे अंदाज काहीही असो आम्ही राज्यात ४५ लोकसभा जागा जिंकणारच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय ज्या तीन जागा अडचणीच्या वाटत आहेत त्यादेखील मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube