शरद पवारांना धक्का! सोलापुरातील राजकीय नाट्यात अजितदादांची कमाल; मोठा नेता फोडला

Letsupp Image   2023 07 05T173654.640

Ajit Pawar News : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणलेल्या बंडाचे धक्के अजूनही बसत आहेत. ठिकठिकाणी पक्षाचे नेते, पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडत अजितदादांच्या गटात सहभागी होत आहेत. आताही पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक बळीराम साठे यांचे पुत्र जितेंद्र साठे अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. जितेंद्र साठे हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत मान यांच्या मध्यस्थीने हा प्रवेश घडवून आणला गेला आहे.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

अजित पवार यांच्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात सहभागी होत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची राजकीय ताकद कमी होत चालली आहे. ऐन निवडणुकीच्या आधीच या घडामोडी घडत असल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यात साठे यांचे वर्चस्व आहे. हा भाग मोहोळ मतदारसंघात येतो. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. त्यावेळीही साठे यांच्याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यांनी भाजपसोबत जाणार असे कधीही सांगितले नव्हते. त्यानंतर आता जितेंद्र साठे यांनी शरद पवार गटाला धक्का देत अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील राजकीय गणिते आता बदलली गेली आहेत. आता येथून पुढे आणखी काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us