राणेंच्या नजरेचं मला काय? नगरकरांच्या नजरेला महत्व, आमदार जगतापांनी ठणकावलं…

राणेंच्या नजरेचं मला काय? नगरकरांच्या नजरेला महत्व, आमदार जगतापांनी ठणकावलं…

नितेश राणेंच्या नजरेचं मला काय, माझ्यासाठी नगरकरांची नजर महत्वाची असल्याचं अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रकरणे घडली आहेत. या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनरला आले होते. पीडितांच्या भेटीनंतर आमदार राणेंनी आमदार जगतापांचा कडक शब्दांत समाचार घेतला होता. त्यावर संग्राम जगतापांनी नितेश राणेंवर हल्लाबोल चढवला आहे.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, ज्या त्या लेवलच्या माणसाला मी लेवलनूसार उत्तर दिलं आहे. कोण माझ्याबद्दल बोलतंय त्याला मी फार महत्व दिलं पाहिजे, असं मला वाटतं नाही. तरीही बाहेरुन आलेल्या आमदाराला माझ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पीडितांच्या भेटीला आलेल्या राणेंनी स्थानिक आमदार म्हणत निशाणा साधला होता. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर मिळवत नसल्याचं आमदार राणे म्हणाले होते. त्यावर जगतापांनी त्याची उंची माझ्या शर्टाच्या बटनाएवढी आहे. राहिला विषय नजरेला नजर मिळवण्याचा तर तुम्ही सांगाल तिथं येतो, असं खुलं चॅलेंज जगतापांनी राणेंना दिलं होतं.

CJI Chandrachud : दोन्ही दिव्यांग मुली कामकाज पाहण्यासाठी न्यायालयात; सरन्यायाधीशांचा जुना फोटो पुन्हा व्हायरल

तसेच नगरच्या जनतेच्या नजरेत जे काम भरेल, असं माझं काम सुरु आहे. नगरकरांच्या नजरेत मी चांगलाचं मुरलेलो आहे. लोकांच्या नजरेप्रमाणे माझं काम सुरु असून इथल्या लोकांना कोण कोणाला नजर मिळवतंय? याचं काही घेण देण नाहीये. जनतेचे प्रश्न कोण सोडवतं हे इथल्या जनतेसाठी महत्वाचं असल्याचं आमदार जगतापांनी स्पष्ट केलंय. नितेश राणेंनी नगरसाठी मोठं काहीतरी पॅकेज आणावं आणि विकासाचे प्रश्न मांडून लोकांना जोडण्याचं काम करावं, असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी राणेंना दिलायं.

Rahul Gandhi का म्हणाले ‘मोहब्बत की शरबत’? पाहा फोटो…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील कापड बाजारपेठेत व्यापाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. या दोन्ही प्रकरणांत व्यापाऱ्यांना एका विशिष्ट समाजाच्या नागरिकांकडून हल्ला करण्यात आल्याने शहरातील दोन गटाचे लोकं समोरासमोर येत असल्याचं दिसून येतंय.

फडणवीसांची सहानुभूती मेली आहे का; श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राऊत भडकले

यावरुनच आता शहरात दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने जिल्ह्यात सामाजिक समतोल रहावा, या दृष्टीने प्रशासनाकडून नजर ठेवण्यात येत आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणेंनी नगरमध्ये येत स्थानिक आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच जगताप-राणे यांच्यात वाकयुद्ध सुरु झालंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube