थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरात खळाळलं; सतेज पाटलांचं पंपिंग स्टेशनवरच अभ्यंगस्नान

  • Written By: Published:
थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरात खळाळलं; सतेज पाटलांचं पंपिंग स्टेशनवरच अभ्यंगस्नान

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन (Kalammawadi Direct Pipeline project) योजना अखेर पूर्ण झाली आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पातून काल (10 नोव्हेंबर) दिवाळीच्या पहिल्या दिवशीच पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला पाणी दाखल झाले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह शहरवासीयांनी गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. आमदार पाटील यांनी पंपिग स्टेशनवरच अंघोळ करत जणू दिवाळीचे अभ्यंगस्नानच केले.

Video : मुंब्य्रात ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले; आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांच्या मदतीशिवाय…’ 

1987 मध्ये अस्वच्छ पाण्यामुळे दोन गर्भवतींचा मृत्यू झाल्यानंतर कोल्हापूरच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतरही अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. अखेरीस तत्कालिन आमदार सतेज पाटील यांनी डिसेंबर 2013 मध्ये काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातून ‘थेट पापईपालाईन योजना मंजूर करुन आणली. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करत मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु होते.

कोणत्याही परिस्थितीत ‘थेट पापईपालाईनच्या पाण्यानेच दिवाळीच अभ्यंगस्नान करणार अशी प्रतिज्ञा सतेज पाटील यांनी केली होती. अखेरीस त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करुन दाखविला आहे. काल रात्री अकरा वाजता थेट पाईपलाईनचे पाणी पुईखडी पंपिंग स्टेशनला आले आणि नऊ वर्षानंतर स्वप्न पूर्ण झाले. पाईपलाईनच पाणी पुईखडी येथे दाखल होताच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह कॉंग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्ते जलपूजनासाठी दाखल झाले.

Diwali Gold Purchase : दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा! सोनं खरं की खोटं असं ओळखा 

आमदार सतेज पाटील यांनी यावेळी गुलालाची उधळण करत आणि हलगीच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. शिवाय त्यांनी दिवाळीपूर्वी पहिली अंघोळ थेट पाईपलाईनच्या पाण्याने केली. कोल्हापूरच्या जनतेला दाखवलेले हे स्वप्न साकार होत असतानाच आमदार  पाटील भावूक झाले होते. कोल्हापुरातील जनतेला कायमस्वरूपी शुद्ध आणि मुबलक पाणी मिळवून दिल्याचा आनंद आणि आत्मिक समाधान मिळालं. या योजनेसाठी अनेक अडचणी आणि संकट आली. मात्र, त्यावर मात करत पाणी मिऴवलं, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे, असं ते म्हणाले.

सातत्याने पाठपुरावा करून पाईपलाईन पूर्ण

तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शिफारशीनंतर या योजनेसाठी सुमारे 483 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आणि प्रत्यक्ष कामाला ऑगस्ट 2014 मध्ये सुरुवात झाली होती. गेल्या आठ, नऊ वर्षांपासून या योजनेचे काम सुरू होतं. अनेक सरकारे बदलली, अनेक अडथळे येत राहिले आले त्यामुळं योजना रखडत गेली होती. मात्र, आमदार पाटील यांच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून पाईपलाईन पूर्ण करून घेतली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube