उद्धव ठाकरेंना धक्का, विजय करंजकरांचा मध्यरात्री अडीच वाजता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Vijay Karanjkar joined Shivsena : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. आश्वासन देऊनही विजय करंजकर (Vijay Karanjkar यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकरांनी बंडांचं निशान फडकवलं. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करंजकरांनी सेनेते प्रवेश केला आहे.
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड, BJP वर आरोप
करंजकर लोकसभेसाठी जोरदार तयारी करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी श्द फिरवला आणि आपल्याला तिकीट नाकारला असा आरोप त्यांनी केला होता.
महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विजय करंजकर नाराज झााले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून ठाकरे गटाकडून बरेच प्रयत्न झाले. मात्र, करंजकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता करंजकर यांची शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
डिजिटल जाहिरातींमध्ये भाजप अव्वल! गुगल-युट्यूबला दिल्या 100 कोटींच्या जाहिराती
प्रवेश करतांना करंजकर म्हणाले की, शिवसेनेचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेली 13 वर्षे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वानुसार काम केलं. लोकसभेसाठी 3 वेळा इच्छुक होतो. गेल्या दीड वर्षापासून मी लोकसभा मतदारसंघात फिरून प्रचार केला. मात्र त्यावेळी त्यांनी इच्छुक नसलेल्यांना उमेदवारी देऊन माझा विश्वासघात केला. जी काही माझी फसवणूक झाली, त्याची दखल कोणीही घेतली नाही, बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम न करता संघटनेत काम सुरू आहे, असा आरोप करंजकरांनी दिला. उबाठात तत्व आणि सत्व उरलं नाही, असं करंजकर म्हणाले.
आधी स्वत:चं आत्मपरिक्षण करा – सीएम शिंदे
दरम्यान, आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वत:चं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्यावर आरोप केले पाहिजे. करंजकरांसाखा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. 50 आमदार, 13 खासदारांसह शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रत्येकजण चुकीचा आहे आणि एक व्यक्ती बरोबर आहे असे होत नाही. मी त्यांना सल्ला देत नाहीत. ते तर सुप्रीम कोर्टालाही सल्ले देतात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.