सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे जात पंचायतीकडून जवळपास 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथं घडला आहे. कुटुंबाला दंड ठोठावण्यापासून ते सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी जातपंचायतीच्या एकूण 5 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय? साताऱ्यातील पुसेगावतील रहिवासी असलेल्या माधुरी धनु भोसले यांच्या मुलाचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबद्दल […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा ११ ते १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत अहमदनगर येथील माऊली सभागृहात होत आहे. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल […]
अहमदनगर : भारतातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. जवानांना येथे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत औरंगाबाद रस्त्यावरील बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आणि जामखेड रस्त्यावरील अमेमेंट इलेक्ट्रॉनिक रेजिमेंट या दोन विभागात हे प्रशिक्षण सुरू […]
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे सारा देश हादरला होता. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्या होत्या. यातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी […]
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]