सहकारी संस्था हवी? भाजप जिल्हाध्यक्षाचे पत्र आणा! : Atul Save यांची बेधडक घोषणा

  • Written By: Published:
सहकारी संस्था हवी? भाजप जिल्हाध्यक्षाचे पत्र आणा! : Atul Save यांची बेधडक घोषणा

अहमदनगर : काही वर्षांपासून राज्यातील नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे (Registration of Co-operative Societies)  काम बंद करण्यात आले होते. ते काम आम्ही परत सुरु करत आहोत. नव्या सहकारी संस्थाची मान्यता थेट मंत्रालयातून होणार आहे. यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिफारस लागणार आहे, अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी आज शहर भाजपच्या बैठकीत केली.

मंत्री अतुल सावे आज अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर आले असता दुपारी लक्ष्मीकारंजा येथील भाजपच्या कार्यालयात त्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यानी मंत्री सावे यांचा स्वागत करून सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, तुषार पोटे, महेश नामदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंनाही सोडलं नाही… 

यावेळी मंत्री सावे म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टी मागे आहे. त्यामुळे आता राज्यात मोठ्याप्रमाणात पक्ष सहकार क्षेत्रात सक्रिय होत अनेक बंद पडलेले साखर कारखाने ताब्यात घेत आहे. अनेक वर्षापासून सहकार संस्थांची नव्याने नोंदणी बंद होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार मध्ये प्रवेश मिळत नव्हता. म्हणून हे सरकार ही बंदी उठवत असून स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची शिफारसीने नव्या सहकारी संस्थांना मंजुरी मिळणार आहे. प्रत्येक गावात सहकारी सोसायटी सुरु करण्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकर घ्यावा, असे आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube