अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार भरती

अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार भरती

अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागांकडे जून २०२२ अखेर सुमारे २७३ रिक्त पदे आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत.

त्यानुसार रिक्त पदांबाबत माहिती मागविली जात आहे. जिल्हा परिषदेकडे अनुकंपा तत्त्वावरील जागांसाठी ३८४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यातील १३५ उमेदवार पात्र झाले आहेत. १४६ उमेदवार अपात्र ठरले आहेत. १०३ उमेदवारांचे अर्ज अपूर्ण होते. सर्वसाधारण फेब्रुवारी किंवा जुलै महिन्यात अनुकंपा तत्त्वावरील पदे भरली जातात.

रिक्त जागा खालील प्रमाणे
संवर्ग नुसार सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहायक पाच, पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक चार, सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता दोन, अर्थ विभागात वरिष्ठ सहायक लेखा तीन, कनिष्ठ सहायक लेख एक, शिक्षण विभाग (प्राथमिक)मध्ये शिक्षण सेवक मराठी ७७, उर्दू तीन, ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी (सांख्यिकी) एक, महिला व बालकल्याण विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिका एक, आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी एक, आरोग्य सेवक महिला १०७, आरोग्य सेवक (फवारणी) ३७, तर सामान्य प्रशासन विभागात परिचर पदाच्या ३१ जागा रिक्त आहेत. will be held in Ahmednagar Zilla Parishad

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube