मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महसूल परिषदेचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महसूल परिषदेचा शुभारंभ

अहमदनगर : राज्य सरकारच्यावतीने आज महसूल आणि वन विभागाच्यावतीने महसूल परिषद-2023 चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालं. राहता तालुक्यातील लोणी इथं महसूल परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.

विशेष बाब म्हणजे प्रथमच अशी राज्यस्तरीय परिषद राज्याच्या ग्रामीण भागात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या गोदावरी सभागृहात या परिषदेस सुरुवात झाली.

‘जो घर नहीं संभाल सके…’; राम कदमांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

दोन दिवस सुरू राहणाऱ्या या परिषदेसाठी राज्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी उपस्थित होते.

धमकी प्रकरणामुळे यंत्रणा अलर्ट; संजय राऊतांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

यादरम्यान वर्ष २०२२ च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी संख्यात्मक अहवाल, रोखवहीबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना पुस्तिकेचे प्रकाशन तसेच ई-चावडी या ऑनलाईन सेवेचे लोकार्पण आणि अर्जदारास पावतीचे वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube